Join us

IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले

IPL 2024 GT vs CSK Live Match : आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 19:04 IST

Open in App

IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi । अहमदाबाद : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ५९ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी गुजराजचा विजय एक सुखद धक्का देणारा असेल. पण चेन्नईच्या विजयाने त्यांची डोकेदुखी वाढणार आहे. १२ गुणांसह चेन्नईचा संघ चौथ्या स्थानावर तर ८ गुणांसह गुजरात तळाशी आहे. (GT vs CSK live Score IPL 2024)

आजच्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकली आहे. कार्तिक त्यागीला आजच्या सामन्यासाठी गुजरातच्या संघात स्थान मिळाले आहे. तर रचिन रवींद्रही आज खेळताना दिसणार आहे.

दरम्यान, चेन्नईच्या संघात रिचर्ड ग्लीसनच्या जागी रचिन रवींद्रला संधी मिळाली. त्याचबरोबर गुजरातने संघात दोन बदल केले आहेत. मॅथ्यू वेडच्या जागी कार्तिक त्यागीचा प्लेईंग ११ मध्ये समावेश झाला तर वृद्धिमान साहाच्या जागी जोशुआ लिटलचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातसाठी वेगवान गोलंदाज कार्तिकचा हा पदार्पणाचा सामना आहे. याआधी तो सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.

गुजरातचा संघ -शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरूख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी. 

चेन्नईचा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग. 

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्सऋतुराज गायकवाड