IPL 2024 Updates: आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान गुजरातचा संघ विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर, दुसरीकडे रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली देखील विजय मिळवून गुणतालिकेत झेप घेण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघांचा विजयासह गुणतालिकेत आगेकूच करण्याचा प्रयत्न असेल. मागील दोन सत्रांप्रमाणे गुजरातचा संघ आतापर्यंत सांघिक कामगिरी न करण्यात अपयशी ठरला आहे. (IPL 2024 News)
कामगिरीतील उणिवा दूर करण्याची न संधी त्यांच्याकडे असणार आहे. गुजरातने गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या राजस्थानविरुद्ध विजय ६ मिळवला होता. आपल्या मोहिमेचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर त्यांना अशाच कामगिरीची गरज आहे. तर दिल्लीने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. पण, त्यांनी लखनौ आणि चेन्नई या तगड्या संघांवर विजय मिळवला होता. मात्र त्यांचा कुठलाच खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेला नाही. शिवाय योग्य संघसंयोजन करण्यात संघव्यवस्थापन अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे पंतच्या दिल्लीला गुणतालिकेत जर प्रगती करायची असेल तर कामगिरीत कमालीचे सातत्य राखावे लागणार आहे.
GT vs DC थरार
यंदाच्या हंगामात देखील दिल्ली कॅपिटल्सचा संघ संघर्ष करताना दिसला. पण, पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर मॅकगर्क, रिषभ पंत या फलंदा-जांवर कामगिरीत सातत्य राखण्याची जबाबदारी असेल. मॅकगर्कच्या रूपाने दिल्लीला तिसऱ्या क्रमांकावर चांगला फलंदाज गवसला आहे. पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक केले होते. त्याच्याकडून पुन्हा शानदार कामगिरीची अपेक्षा असेल. दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवमुळे दिल्लीला मोठा दिलासा मिळाला आहे. कुलदीपने लखनों- विरुद्ध तीन गडी बाद केले होते. त्याचा सामना करणे गुजरातसाठी आव्हानात्मक असेल.
गुजरातच्या संघाने मुंबईला नमवून विजयी सलामी दिली होती. पण त्यानंतर त्यांची गाडी विजयाची रूळावरून घसरली. फलंदाजीत वृद्धिमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर शानदार कामगिरी करत आहेत. साई सुदर्शन, मिलर यांनी काही सामन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत मोहित शर्मा, स्पेंसर जॉन्सन, उमेश यादव, राशिद खान यांच्यावर जबाबदारी आहे. पण, गुजरातला विजयासाठी गोलंदाजीत खूप सुधारणा करावी लागणार आहे. राजस्थानविरुद्ध गुजरातच्या राशिदने फलंदाजीतही शानदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला होता.