Join us  

Video: आईकडून गोड पापा, बापाकडून कडकडीत मिठी.. शुबमन गिलचं हॉटेलमध्ये दणक्यात स्वागत!

Shubman Gill, IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians: हार्दिकच्या मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार शुबमन गिलचे सगळ्यांनीच अभिनंदन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 10:37 AM

Open in App

Shubman Gill Video, IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians: IPL 2024 मधील मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली. हार्दिकने गुजरातला सोडचिठ्ठी देत मुंबईचे नेतृत्व केले. परंतु, नव्याने कर्णधार झालेल्या शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने मुंबईवर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. गुजरातच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १६८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला, पण अखेर शुबमन गिलच्या गुजरातने मुंबईवर मात केली. कर्णधार म्हणून आपला पहिलाच सामना जिंकणाऱ्या शुबमन गिलला विजयानंतर आई-वडीलांकडून एक गोड 'सरप्राईज' मिळालं.

सामना जिंकून गुजरातचा संघ हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा शुबमनला सुखद धक्का बसला. त्याचे आई वडील हॉटेलमध्येच होते. शुबमन आपल्या आई वडीलांना पाहून एकदम खुश झाला. आई वडिलांनी आपल्या लेकाला जवळ घेत घट्ट मिठी मारली आणि विजयाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वात आधी वडीलांनी शुबमनला मिठी मारली. त्यानंतर तो आपल्या आईकडे गेला आणि आईने त्याला मायेने जवळ घेतले. शुबमनची बहीण शहनील देखील सोबत होती. तिने आपल्या भावाचे कौतुक केले आणि इतर खेळाडूंचेही अभिनंदन केले.

दरम्यान, सामन्यात शुबमनला फार मोठी खेळी करता आली नाही. त्याने २२ चेंडूत ३१ धावा केल्या. पण साई सुदर्शनने मात्र सर्वाधिक ४५ धावा केल्या. राहुल तेवातियानेही १५ चेंडूत २२ धावा केले. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ३ बळी टिपले. १६८ धावांचा पाठलाग करताना डेवाल्ड ब्रेव्हिसने ४६ तर रोहित शर्माने ४३ धावा केल्या. पण दोघांचीही अर्धशतके हुकली. तिलक वर्माने २५ धावा करत संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण अखेर मुंबईला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.  

टॅग्स :आयपीएल २०२४शुभमन गिलगुजरात टायटन्समुंबई इंडियन्सहार्दिक पांड्या