अहमदाबाद : मयंक यादवच्या तुफानी माऱ्यापुढे नांगी टाकणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांना गुरुवारी मोटेराच्या संथ खेळपट्टीवर गुजरातच्या गोलंदाजांच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल. पंजाबने मागील दोन्ही सामने गमावले. गुजरातविरुद्धचा पराभव त्यांची पुढील वाटचाल कठीण करू शकतो. गुजरातने मात्र हैदराबादला ७ गड्यांनी सहज पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला.
पंजाब- डेथ ओव्हरमधील फलंदाजी हा चिंतेचा विषय. कर्णधार शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना मोहित शर्माच्या संथ बाऊन्सर आणि वाईड यॉर्करचा सामना करावा लागेल.- हर्षल पटेल, राहुल चाहर यांनी निराश केले. ‘डेथ ओव्हर’मधील यॉर्करतज्ज्ञ अर्शदीप सिंग हादेखील अपेक्षापूर्ती करू शकलेला नाही.
गुजरात- सांघिक खेळी करण्यात अद्याप यश आले नसले तरी कर्णधार शुभमन गिल वगळता अन्य फलंदाज योगदान देत आहेत. अष्टपैलू अजमतुल्लाह ओमरजई संघाची ताकद ठरला.- राशीद खान, नूर अहमद यांच्यासह गोलंदाजांनी धावांचा यशस्वीपणे बचाव केला. साई किशोर आणि मोहित शर्मा डेथ ओव्हरमध्ये चांगला मारा करतात.