IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. आयपीएल २०२४ मधील निचांक खेळीची नोंद आज झाली आणि गुजरात टायटन्सवर हा नकोसा विक्रम नोंदवला गेला. GT चा संपूर्ण संघ ८९ धावांत तंबूत पाठवल्यानंतर DC ने हे लक्ष्य ८.५ षटकांत सहज पार केले. दिल्लीने ८.५ षटकांत ४ बाद ९२ धावा केल्या. या विजयानंतर दिल्लीने ९व्या क्रमांकावरून थेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली. त्यांनी गुजरातला नेट रन रेटच्या जोरावर मागे ढकलले.
जॅक फ्रेजर-मॅकगर्कने खणखणीत षटकाराने DCच्या डावाची सुरुवात केली. १० चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २० धावा चोपणाऱ्या जॅकला दुसऱ्या षटकात स्पेन्सर जॉन्सनने माघारी पाठवले. पृथ्वी शॉ ( ७) संदीप वॉरियरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पण, शे होप व अभिषेक पोरेल यांनी ४,४,४,६,६,१,६ अशी फटकेबाजी करून दिल्लीला पुन्हा फ्रंटसीटवर बसवले. पण, संदीपने १५ धावा ( ७ चेंडू) करणाऱ्या पोरेलला माघारी पाठवले. शे होपही ( १९) राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला, परंतु DC ने पॉवर प्लेमध्ये ४ बाद ६७ धावा उभ्या केल्या. रिषभने फटकेबाजी करून सामना ९व्या षटकात संपवला. दिल्लीने ६ विकेट्सने हा सामना जिंकला.
तत्पूर्वी, शुबमन गिल ( ८), वृद्धीमान सहा ( २), साई सुदर्शन ( १२) आणि डेव्हिड मिलर ( २) हे पॉवर प्लेमध्ये माघारी पारतले. सुमित कुमारने क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवताना साईला रन आऊट केले, रिषभ पंतनेही मिलरला अफलातून झेल घेतला. अभिनव मनोहर ( ८) व इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या शाहरुख खान ( ०) यांना त्रिस्तान स्तब्सच्या पहिल्याच षटकात रिषभने चतुराईने स्टम्पिंग करून माघारी पाठवले. राहुल तेवाटिया ( १०) व मोहित शर्मा ( ४) फेल गेले. राशिद खानने २३ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. मुकेश कुमारने १८व्या षटकात दोन विकेट्स घेऊन गुजरातचा डाव ८९ धावांवर गुंडाळला. मुकेश कुमारने ३, तर इशांत शर्मा व त्रिस्तान स्तब्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : DC won the match in 8.5 overs against GT, took a big leap in the Point Table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.