IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मागील दोन दिवसांत दोन वेळा संघांनी पाचशेपार धावा चोपल्या असताना आज कमाल झालेली पाहायला मिळाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणाऱ्या यजमान गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ १७.३ षटकांत ८९ धावांवर तंबूत परतला. IPL 2024 मध्ये शंभरच्या आत ऑल आऊट होणारा हा पहिलाच संघ ठरला आणि GT ही निचांक कामगिरी ठरली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले, त्याचवेळी रिषभ पंतने ( Rishabh Pant) यष्टींमागे कमाल केली.
शुबमन गिल ( ८), वृद्धीमान सहा ( २), साई सुदर्शन ( १२) आणि डेव्हिड मिलर ( २) हे पॉवर प्लेमध्ये माघारी पारतले. सुमित कुमारने क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवताना साईला रन आऊट केले, रिषभ पंतनेही मिलरला अफलातून झेल घेतला. अभिनव मनोहर ( ८) व इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या शाहरुख खान ( ०) यांना त्रिस्तान स्तब्सच्या पहिल्याच षटकात रिषभने चतुराईने स्टम्पिंग करून माघारी पाठवले. राहुल तेवाटिया ( १०) व मोहित शर्मा ( ४) फेल गेले. राशिद खानने २३ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. मुकेश कुमारने १८व्या षटकात दोन विकेट्स घेऊन गुजरातचा डाव ८९ धावांवर गुंडाळला.