IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर रडवले. रिषभ पंतने यष्टींमागून कमाल दाखवताना दोन सुरेख झेल घेतले व दोन चतुर स्टम्पिंग केल्या. DC च्या गोलंदाजांचे करावे तितके कौतुक कमीच... GT साठी राशिद खानने सर्वाधिक ३१ धावा करून यजमानांची लाज वाचवली.
Power Play मध्ये गुजरातचे चार फलंदाज ३० धावांत माघारी पाठवून DC ने सामन्यावर पकड घेतली. इशांत शर्माने युवा फलंदाज शुबमन गिल ( ८) याला बाद केले. त्यानंतर मुकेश कुमारने चौथ्या षटकात वृद्धीमान सहाचा ( २) त्रिफळा उडवला. साई सुदर्शनने ( १२) विकेट फेकली, सुमित कुमारने अचूक थ्रो करून त्याला रन आऊट केले. शर्माने डेव्हिड मिलर ( २) याला माघारी पाठवले आणि यष्टींमागे रिषभ पंतने अप्रतिम झेल घेतला. गुजरातवर दडपण वाढवण्यासाठी रिषभने फिरकीपटू त्रिस्तान स्तब्सला आणले आणि त्याने दोन विकेट्स घेतल्या. अभिनव मनोहर ( ८) व इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या शाहरुख खान ( ०) यांना रिषभने चतुराईने स्टम्पिंग करून माघारी पाठवले.
राहुल तेवाटियालाही ( १०) पायचीत करून गुजरातची अवस्था ७ बाद ६६ अशी दयनीय केली. राशिद खानवर आता सर्व मदार होती आणि त्याला सोबतीला गोलंदाजांना घेऊ चालायचे होते. पण, मोहित शर्मासोबत संयमी खेळ करण्याची वेळ आली तेव्हा राशिदने जलदगती गोलंदाज खलिल अहमदसमोर मोहितला स्ट्राईक दिली. मोहित ( ४) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. राशिदने २३ चेंडूंत ३१ धावा चोपल्या आणि १८व्या षटकात मुकेश कुमारने त्याला माघारी पाठवले. मुकेशे त्याच षटकात विकेट घेऊन दिल्लीचा डाव ८९ धावांवर गुंडाळला.
Web Title: IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : Rashid Khan scored 31 runs from 24 balls including 2 fours and 1 six, but GUJARAT TIANTS ALL OUT ON 89 RUNS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.