GT vs PBKS Live : गिलने जिंकलं दिल! शुबमनने मोडला Mr. IPL, रहाणे, विराट, रोहित यांचा मोठा विक्रम 

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 08:40 PM2024-04-04T20:40:12+5:302024-04-04T20:40:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - Shubman Gill becames second fastest Indian Player to reach 3000 IPL Runs | GT vs PBKS Live : गिलने जिंकलं दिल! शुबमनने मोडला Mr. IPL, रहाणे, विराट, रोहित यांचा मोठा विक्रम 

GT vs PBKS Live : गिलने जिंकलं दिल! शुबमनने मोडला Mr. IPL, रहाणे, विराट, रोहित यांचा मोठा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडत आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने आतापर्यंत ३ पैकी २ सामने जिंकले आहेत, तर पंजाबला तेवढ्याच सामन्यांत केवळ एक विजय मिळवता आला आहे. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला... गुजरात टायटन्स तगडं आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघांना दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागला आहे. 


पंजाब किंग्सच्या कागिसो रबाडाने GTचा ओपनर वृद्धीमान साहा याला ३, तर गिलला २ वेळा बाद केले आहे. टायटन्सच्या कर्णधाराने रबाडाविरुद्ध ८ डावांत ४२ चेंडूंत ४३ धावा केल्या आहेत. पंजाबविरुद्ध गिलचा रेकॉर्ड चांगला आहे आणि त्याने पंजाबविरुद्ध १० इनिंग्जमध्ये ५६.७१ च्या सरासरीने ३९७ धावा केल्या आहेत. सॅम कुरन आयपीएलमधील पन्नासावा सामना आज खेळतोय. शुबमन गिल आणि वृद्धीमान सहा ( ११) यांनी  २९ धावांची सुरुवात केली आणि कागिसो रबाडाने पंजाबला पहिली विकेट मिळवून दिली. गिल व केन विलियम्सन यांनी डाव सावरला, परंतु त्यांच्या धावांचा वेग हवा तसा नव्हता. त्यामुळे चाहत्यांना फटकेबाजीची वाट पाहावी लागली. हरप्रीत ब्रारने ४० धावांची ही भागीदारी मोडताना केनला ( २६) झेलबाद केले. १० षटकांत गुजरातने २ बाद ८३ धावा फलकावर चढवल्या. 


साई सुदर्शनने GT च्या धावांचा वेग वाढवला आणि त्याने सिकंदर रझाचा चांगलाच समाचार घेतला. साईने गिलसह २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हर्षल पटेलने ही जोडी तोडली आणि साई १९ चेंडूंत ६ चौकारांसह ३३ धावांवर झेलबाद झाला. दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वात वेगाने ३००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये शुबमनने आज दुसरे स्थान पटकावताना Mr. IPL सुरेश रैना ( १०३ इनिंग्ज), अजिंक्य रहाणे ( १०४), रोहित शर्मा/शिखर धवन ( १०९) आणि गौतम गंभीर/विराट कोहली ( ११०) यांचा विक्रम मोडला. लोकेश राहुलने ८० इनिंग्जमध्ये हा पल्ला पार केला होता, तर गिलला ९२ इनिंग्ज खेळाव्या लागल्या.  

Web Title: IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - Shubman Gill becames second fastest Indian Player to reach 3000 IPL Runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.