Cameron Green Catch Video, IPL 2024 KKR vs RCB: बंगळूरू विरुद्धच्या सामन्यात कोलकताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दहा षटकांमध्ये चांगली खेळी केली. सलामीवीर सुनील नारायण आणि फिल सॉल्ट यांनी पहिल्या चार षटकात अर्धशतक गाठून दिले, होते पण त्यानंतर पुढील खेळाडूंना ती धावगती कायम राखता आली नाही. याचे कारण म्हणजे कोलकाताच्या संघाने धावा करण्याच्या प्रयत्न सातत्याने आपले गडी गमावले. त्यातही कॅमेरामन ग्रीनने अंगक्रिश रघुवंशीचा पकडलेला झेल विशेष चर्चेत राहिला.
प्रथम फलंदाजी करताना पहिल्या तीन षटकात कोलकाताने 27 धावा केल्या होत्या. चौथ्या षटकात तब्बल 28 धावा करत कोलकाताने अर्धशतक साजरे केले. त्यानंतर पाचव्या षटकात फील सॉल्ट 48 धावांवर बाद झाला तर सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुनील नारायण स्वस्तात माघारी परतला. या षटकात शेवटच्या चेंडूवर रघुवंशीने हवेत फटका खेळला. हा फटका डोक्यावरून चौकारासाठी जाईल असा त्याला अंदाज होता, पण कॅमेरॉन ग्रीनने उंचीचा सुंदर उपयोग केला. तब्बल आठ फूट उंचीवर असलेला चेंडू ग्रीनने उडी मारून टिपला आणि एक उत्कृष्ट झेल घेतला. पाहा Video:
त्याआधी, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सध्या गुणतालिकेत KKRचा संघ खूपच चांगल्या स्थितीत आहे. त्यांनी ६ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला असून ते ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. तर RCB ७ पैकी केवळ १ सामना जिंकून गुणतक्त्यात तळाशी आहेत. बंगळुरूच्या संघाने स्पर्धेतील सर्वात पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर ते सलग ६ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी संघात तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. बंगळुरूच्या संघात मोहम्मद सिराज, कॅमेरॉन ग्रीन आणि करण शर्मा या तिघांना स्थान देण्यात आले आहे. कोलकाताच्या संघाने मात्र कोणताही बदल केलेला नाही.