IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : कोलकाता नाईट रायडर्सने १० वर्षानंतर इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले. २०१२ व २०१४ मध्ये त्यांनी गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) नेतृत्वाखाली आयपीएल चषक उंचावला होता आणि आता गौतम गंभीर हा त्यांचा मेंटॉर आहे. कर्णधार व मेंटॉर म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकणारा गंभीर हा पहिलाच खेळाडू आहे. IPL 2024 Final मध्ये KKR ने उत्तम गोलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव केला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर वेंकटेश अय्यरने एकहाती सामना जिंकून दिला.
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी
SRH ने फायनलमध्ये पूर्णपणे लोटांगण घातले. कर्णधार पॅट कमिन्स ( २४) हा SRH साठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मिचेल स्टार्क ( २-१४), हर्षित राणा ( २-२४) व आंद्रे रसेल ( ३-१९) यांच्या माऱ्यासमोर SRH चा पूर्ण संघ १८.३ षटकांत ११३ धावांत तंबूत परतला. मिचेल स्टार्कने भेदक मारा करून KKR ला अपेक्षित सुरुवात करून दिली. वैभव अरोरा व हर्षित राणा यांनी त्याला सुरुवातीच्या षटकांत चांगली साथ दिली. कमिन्स व जयदेव उनाडकट ( ४) यांची २३ धावांची भागीदारी ही सामन्यातील दुसरी सर्वोत्तम ( २६ धावा, नितीश रेड्डी व एडन मार्करम) भागीदारी ठरली. आयपीएल फायनलमधील ही निचांक कामगिरी राहिली आणि फायनलमध्ये ऑल आऊट होणारा SRH हा पहिलाच संघ ठरला. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सने ९ बाद १२५ धावा केल्या होत्या.
सुनील नरीनने या लढतीपूर्वी १४ सामन्यांत ४८२ धावा केल्या होत्या आणि १६ विकेट्सही घेतल्या होत्या. आज त्याने १८ धावा करताच वेगळा विक्रम नावावर करण्याची संधी होती. आयपीएलच्या एका पर्वात ५०० हून अधिक धावा आणि १५ हून अधिक विकेट्स घेणारा तो इतिहासातील पहिला खेाडू ठरला असता. शिवाय रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल व गौतम गंभीर यांच्यानंतर KKR साठी एका पर्वात ५००+ धावा करणाऱ्या चौथ्या फलंदाजाचा विक्रमही त्याला खुणावत होता. पण, पॅट कमिन्सने दुसऱ्याच षटकात नरीनला ( ६) झेलबाद करून माघारी पाठवले. मात्र, याचा अन्य फलंदाजांवर काही परिणाम झाला नाही. वेंकटेश अय्यरने तिसऱ्या षटकात ४,६,६, असे खणखणीत फटके खेचले.