IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सच्या पथ्यावर पडला. मिचेल स्टार्कने त्याच्या पहिल्या दोन षटकांत धक्के दिल्यानंतर वैभव अरोरा, हर्षित राणा यांनी कमाल केली. आंद्रे रसेलने सलग दोन षटकांत दोन विकेट्स घेऊन SRH ला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले.
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी
पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर याने आम्हाला प्रथम गोलंदाजीच करायची होती असे म्हटले. SRH ची आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये सुरुवात निराशाजनक झाली. KKR ने त्यांचे ३ फलंदाज २१ धावांत तंबूत परतले. अभिषेक शर्मा ( २), ट्रॅव्हिस हेड ( ०) व राहुल त्रिपाठी ( ९) यांना मिचेल स्टार्क व वैभव अरोरा यांनी माघारी पाठवले. हर्षित राणाने SRH ला चौथा धक्का देताना नितीश कुमार रेड्डीला १३ धावांवर माघारी पाठवले. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा आज स्वस्तात बाद झाल्याने त्यांना आयपीएल २०२४ मध्ये अनुक्रमे ५६७ व ४८२ धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विराट कोहलीची ( ७४१ धावा) ऑरेंज कॅप निश्चित झाली.
आद्रे रसेलने KKR ला पाचवे यश मिळवून दिले. एडन मार्कराम मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात २० धावांवर झेलबाद झाला आणि SRH ने ६२ धावांवर निम्मा संघ तंबूत परतला. आयपीएल फायनलमध्ये १००च्या आत ५ विकेट्स गमावूनही जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स ( २०१७) हा एकमेव संघ आहे. RCB 2009, RCB 2011, CSK 2013 व RR 2022 यांना अपयश आले आहे. वरूण चक्रवर्थीन १२व्या षटकात शाहबाज अहमदला ( ८) बाद केले. रसेलने त्याच्या दुसऱ्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर अब्दुल समदला ( ४) बाद करून हैदरबादची अवस्था ७ बाद ७७ अशी केली.