Join us  

SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 

मिचेल स्टार्कने ( MITCHELL STARC ) ने पॉवर प्लेमध्ये तीन धक्के देऊनही सनरायझर्स हैदराबादने डाव सावरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 8:54 PM

Open in App

IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi :  मिचेल स्टार्कने ( MITCHELL STARC ) ने पॉवर प्लेमध्ये तीन धक्के देऊनही सनरायझर्स हैदराबादने डाव सावरला होता. राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला. पण, दुर्दैवीरित्या त्याची विकेट पडली आणि मालकिण काव्या मारन नाराज दिसली. पण, त्रिपाठीही ढसाढसा रडताना दिसला.

समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 

२४.७५ कोटींचा गोलंदाज मिचेल स्टार्क याने KKR ला स्वप्नवत सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकात SRH चा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवल्यानंतर पाचव्या षटकात नितीश रेड्डी ( ९) व शाहबाज अहमद ( ०) यांना सलग दोन चेंडूंवर माघारी पाठवले. वैभव अरोराने दुसऱ्या षटकात हैदराबादचा दुसरा सलामीवीर अभिषेक शर्माला ( ३) बाद करून संघाला मजबूत पकड मिळवून दिली.   पॉवर प्लेमध्ये हैदराबादची अवस्था ४ बाद ४५ अशी दयनीय झाली होती.  जीवदान मिळालेला त्रिपाठी KKR वर भारी पडताना दिसला. त्याला हेनरिच क्लासेनची दमदार साथ मिळाली, परंतु ३७ चेंडूंत ६२ धावांची ही भागीदारी वरुण चक्रवर्थीने तोडली. क्लासेनने मोठा फटका मारला आणि सीमारेषेवर रिंकू सिंगने सहज झेल टिपला. क्लासेन २१ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३२ धावांवर बाद झाला.    राहुल त्रिपाठीने कोलकाताची डोकेदुखी वाढवली होती आणि तो मैदानावर उभा असल्याने हैदराबादला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. पण, १३व्या षटकात अब्दुल समद व त्रिपाठी यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला. सुनील नरीनच्या चेंडूवर समदने चांगला कट शॉट मारला, परंतु आंद्रे रसेलने तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण केले. त्रिपाठी खेळपट्टीच्या मध्यभागी पोहोचेपर्यंत रसेलने चेंडू यष्टिरक्षक रहमनुल्लाहकडे सोपववा. राहुल त्रिपाठी ३५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५५ धावांवर रन आऊट झाला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हैदराबादने सनवीर सिंगला पाठवले, परंतु नरीनने चतुराईने त्याचा त्रिफळा उडवला. त्रिपाठी चांगला खेळत होता आणि अशा पद्धतीने बाद झाल्याने तो स्वतःवर नाराज दिसला. ड्रेसिंग रुमच्या जिन्यांवर तो बसून रडताना दिसला.  

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्सकाव्या मारन