IPL 2024 Updates: आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी दोन नवीन खेळाडूंची या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) जखमी मुजीब उर रहमानच्या जागी अल्लाह गझनफरची निवड केली तर राजस्थान रॉयल्सने (RR) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी (IPL 2024) प्रसिध्द कृष्णाच्या जागी केशव महाराजला संघात समाविष्ट केले आहे. (IPL 2024 News) यंदाच्या हंगामात केकेआर वगळता जवळपास सर्वच संघांनी प्रत्येकी २-२ सामने खेळले आहेत. केकेआरने आपल्या सलामीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.
अल्लाह गझनफरने २ वन डे सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. या युवा खेळाडूने ३ ट्वेंटी-२० आणि ६ प्रथम श्रेणी सामने खेळले असून, त्याच्या नावावर अनुक्रमे ५ आणि ४ बळींची नोंद आहे. त्याला केकेआरने २० लाख रूपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले.
भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर आहे. अलीकडेच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि तो सध्या विश्रांती घेत आहे. त्याच्या जागी राजस्थान रॉयल्सने दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजला आपल्या संघात घेतले. महाराजने २७ ट्वेंटी-२०, ४४ वन डे आणि ५० कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३७ बळींची नोंद आहे. त्याने १५९ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये १३० बळी घेतले आहेत. राजस्थानने त्याला ५० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह आपल्या संघाचा भाग बनवले.