IPL 2024, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Marathi : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिल्ली कॅपिटल्सला महागात पडला. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना पाहुण्यांना जखडून ठेवले. दडपणात त्यांनी विकेटही फेकल्या. KKR च्या सुनील नरीन व वेंकटेश अय्यर या फिरकीपटूंनी खेळपट्टीचा चांगला उपयोग केला. वैभव अरोरा, हर्षित राणा व मिचेल स्टार्क या जलदगती गोलंदाजांनी सुरुवातीलाच DC ला धक्के दिले होते. दिल्लीसाठी कुलदीप यादवने सर्वाधिक धावा करून KKR समोर सन्मानजनक लक्ष्य उभे केले.
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video
DC ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, KKR समोर तगडे लक्ष्य ठेवण्याचा निर्धार रिषभ पंतने व्यक्त केला. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ याने तीन सुरेख चौकार खेचले. पण, वैभव अरोराने दुसऱ्या षटकात पृथ्वीला ( १३) माघारी पाठवले. जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( १२) याला शांत ठेवण्यात KKR ला यश आले. स्टार्कच्या गोलंदाजीवर वेंकटेश अय्यरने सुरेख झेल टिपून मॅकगर्कला माघारी पाठवले. अरोराने अप्रतिम इनस्विंग चेंडू टाकून शे होपचा ( ६) त्रिफळा उडवला. ३७ धावांत आघाडीचे ३ फलंदाज दिल्लीने गमावले. पण, रिषभ पंत व अभिषेक पोरेल यांनी चांगला खेळ करताना संघाला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ६७ धावांपर्यंत पोहोचवले.