IPL 2024, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Marathi : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के केले. ११ सामन्यांत ८ विजय मिळवून १६ गुणांसह त्यांनी राजस्थान रॉयल्सला मागे टाकून नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले आहे. रविवारी लखनौ सुपर जायंट्सवर त्यांनी दणदणीत विजय मिळवून हा पराक्रम केला. सुनील नरीनच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीने KKR चा विजय पक्का केला.
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
लोकेश राहुल व अर्शीन कुलकर्णी यांनी दोन षटकांत २० धावा करून चांगली सुरुवात केलीच होती, परंतु मिचेल स्टार्कच्या अप्रतिम चेंडूवर रमणदीप सिंग याने अविश्वसनीय झेल घेतला. कुलकर्णी ९ धावांवर माघारी परतला. कॅप्टन लोकेश ( २५) व मार्कस स्टॉयनिस यांनी धावांचा वेग कायम राखताना संघाला ७.३ षटकांत ७० धावांपर्यंत पोहोचवले होते. हर्षित राणाने ही ५० धावांची भागीदारी तोडताना लोकेशला बाद केले. दीपक हुडाने चौकाराने सुरुवात केली खरी, परंतु वरुण चक्रवर्थीच्या फिरकीसमोर तो टीकला नाही. हुडा ५ धावांवर बाद झाल्याने LSG ला ७७ धावांवर तिसरा धक्का बसला. आंद्रे रसेलने डावातील १०व्या षटकात मार्कस स्टॉयनिसची ( ३६) विकेट घेऊन KKR ला मोठा दिलासा दिला. १० षटकांत लखनौचे ४ फलंदाज ९६ धावांवर तंबूत परतले होते.
रसेलने त्याच्या पुढच्या षटकात निकोलस पूरनची ( १०) विकेट मिळवून सामन्याला निकाल KKR च्या बाजूने पक्का केला. नरीनने चतुराईने आयुष बदोनीला ( १५) बाद करून LSG ची शेवटची आशाही मावळून टाकली. LSG चे विकेटसत्र थांबत नव्हते आणि चक्रवर्थीने दुसरी विकेट घेताना अॅश्टन टर्नरला ( १६) कॉट अँड बोल्ड केले. पाठोपाठ हर्षित राणाने कृणाल पांड्याला ( ५) बाद केले. LSG चा संपूर्ण संघ १३७ धावांत तंबूत पाठवून KKR ने ९८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. चक्रवर्थीने ३, हर्षीत राणाने ३ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी सुनील नरीनच्या ८१ धावांच्या वादळी खेळीने KKR ला २३७ धावांचे डोंगर उभे करून दिले. लखनौच्या एकाना स्टेडियमवर प्रथमच एखाद्या संघाने दोनशेपार धावा केल्या आहेत. सुनील नरीन आणि फिल सॉल्ट ( ३२) यांनी पहिल्या विकेटसाठी ४.२ षटकांत ६१ धावा चढवल्या. नरीन ३९ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ८१ धावांवर बाद झाला. अंगक्रिश रघुवंशीने ( ३२) चांगली खेळी केली. आंद्रे रसेल ( १२), रिंकू सिंग ( १६) हे अपयशी ठरले. रमणदीप सिंग ( ६ चेंडूंत २५ धावा ) व कर्णधार श्रेयस अय्यर ( २३) यांनी संघाला ६ बाद २३५ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: IPL 2024, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Marathi : Kolkata Knight Riders on top of the Point Table! Defeated LSG and almost secured a place in the play offs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.