IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ स्पर्धा ही फलंदाजांनी गाजवली आहे. यंदाच्या पर्वात सर्वाधिक ४ वेळा संघांनी २५०+ धावा चोपल्या. कोलकाताच्या ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्सने २६१ धावा उभ्या केल्यानंतर पंजाब किंग्सला हा भार सोसणार नाही असेच वाटलेले. पण, दोन सामने बाकावर बसवल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या जॉनी बेअरस्टोने ( Jonny Bairstow) वादळी शतक झळकावून KKR चे धाबे दणाणून सोडले.
जॉनी जॉनी... १६ चेंडूंत ८० धावा! बेअरस्टोचे ईडन गार्डवर वादळी शतक; अश्विनची “Save the bowlers” पोस्ट
PBKS ला प्रभसिमरन सिंग व जॉनी बेअरस्टो यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६ षटकांत ९३ धावा उभ्या केल्या. प्रभसिमरनने २० चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ५४ धावांवर दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. रायली रूसो ( २६) याच्यासोबत बेअरस्टोने PBKS ला १० षटकांत १ बाद १३२ धावांपर्यंत पोहोचवले. २०१४ मध्ये त्यांनी SRH विरुद्ध पहिल्या १० षटकांत ३ बाद १३१ धावा केल्या होत्या आणि आज तो विक्रम मोडला. बेअरस्टो आणि रूसो यांनी ३९ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली. PBKS ने १५ षटकांत २ बाद २०१ धावा उभ्या केल्या आणि शेवटच्या ३० चेंडूंत ६१ धावा त्यांना करायच्या होत्या. नरीनने त्याच्या ४ षटकांत फक्त २४ धावा देत १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, ईडन गार्डनवर ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली गेली. KKR ने ६ बाद २६१ धावांचा डोंगर उभा केला. सुनील नरीनने ३२ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७१ धावा चोपल्या, तर फिल सॉल्टने ३७ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ७५ धावा केल्या. या दोघांनी ईडन गार्डनवर आयपीएल इतिहासात सर्वाधिक १३८ धावांच्या भागीदारीचा विक्रम नावावर केला. आंद्रे रसेल ( २४), श्रेयस अय्यर ( २८) व वेंकटेश अय्यर ( ३९*) यांनीही चांगले फटके खेचून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.