सुनील नरीनची पहिली सेन्च्युरी; KKR ची लैय भारी कामगिरी! RR समोर दोनशेपार टार्गेट 

Sunil Narine ने उत्तुंग फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना फोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:20 PM2024-04-16T21:20:23+5:302024-04-16T21:23:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : Maiden century SUNIL NARINE score 109 runs (56) with 13 fours and 6 sixes, KKR set 224 runs target to RR | सुनील नरीनची पहिली सेन्च्युरी; KKR ची लैय भारी कामगिरी! RR समोर दोनशेपार टार्गेट 

सुनील नरीनची पहिली सेन्च्युरी; KKR ची लैय भारी कामगिरी! RR समोर दोनशेपार टार्गेट 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live :  कोलकाताच्या ईडन गार्डनवर पुन्हा एकदा सुनील नरीन नामक कॅरेबियन वादळ घोंगावले. Sunil Narine ने उत्तुंग फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना फोडले. त्याने आयपीएलमधील त्याचे पहिले शतक झळकावले आणि आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो ख्रिस गेल व लेंडल सिमन्स यांच्यानंतर तिसरा कॅरेबियन फलंदाज ठरला. 

११ चौकार, ६ षटकार! Sunil Narine चा राजस्थानवर शतकी प्रहार, मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम


राजस्थानने नाणेफेक जिंकून यजमान कोलकाताला प्रथम फलंदाजीला बोलावले आणि चौथ्या षटकात आवेश खानने त्यांना धक्का दिला. फिल सॉल्टला ( १०) माघारी पाठवले. पण, सुनील नरीन व अंगक्रिश रघुवंशी यांनी ४३ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी करून KKR ला १०.४ षटकांत १०६ धावा करून दिल्या. कुलदीप सेन याने ही जोडी तोडली अन् रघुवंशी १८ चेंडूंत ५ चौकारांसह ३० धावांवर झेलबाद झाला. यंदाच्या पर्वात पहिल्या १० षटकांत १०० हून अधिक धावा करण्याची KKR ची ही चौथी वेळ आहे आणि त्यांनी SRH व MI ( ३) यांना मागे टाकले. कर्णधार श्रेयस अय्यरला ( ११) युझवेंद्र चहलने पायचीत केले. 



नरीनने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती आणि आंद्रे रसेल नॉन स्ट्राईक एंडवरून ही फटकेबाजी पाहत होता. RR चा यशस्वी गोलंदाज आर अश्विनच्या ४ षटकांत ४९ धावा चोपल्या गेल्या. चहलने टाकलेल्या १६व्या षटकात नरीनने ६,४,६,४ असे फटके खेचून ४९ चेंडूंत शतक पूर्ण केले. स्ट्रॅटेजिक टाईम आऊटनंतर आंद्रे रसेल ( १३) याला आवेशने बाद केले.  आयपीएलमधील नरीनचे हे पहिले शतक ठरले, तर KKR कडून सेन्चुरी ठोकणारा तो तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी ब्रेंडन मॅक्युलम ( 158* v RCB - 18th Apr 2008  व वेंकटेश अय्यर ( 104 v MI - 16th Apr 2023) यांनी ही कामगिरी केली. १८व्या षटकात ट्रेंट बोल्टने अप्रतिम यॉर्कवर नरीनचा त्रिफळा उडवला. नरीन ५६ चेंडूंत १३ चौकार व ६ षटकारांसह १०९ धावांवर माघारी परतला.  



चहलने आज ५४ धावा देताना १ विकेट्स घेतल्या आणि ही त्याची आयपीएलमधील खराब कामगिरी ठरली. २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने ४ षटकांत २ बाद ५१ धावा दिल्या होत्या. वेंकटेश अय्यर ८ धावांवर बाद झाला. रिंकू सिंगने ९ चेंडूंत २० धावा चोपून कोलकाताला ६ बाद २२३ धावा उभारून दिल्या. आवेश खान व कुलदीप सेन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. 

Web Title: IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : Maiden century SUNIL NARINE score 109 runs (56) with 13 fours and 6 sixes, KKR set 224 runs target to RR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.