IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर थरारक विजय मिळवला. RRच्या हातून सामना गेला असे वाटत असताना रॉव्हमेल पॉवेलच्या ( Rovman Powell) झंझावाताने KKR ला बॅकफूटवर फेकले. राजस्थान रॉयल्सचा RR आणि रोव्हमनचा R असा RR'R' परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यानंतर जॉस बटलरचे ( Jos Buttler) वादळ घोंगावले आणि त्याने ५५ चेंडूंत शतक पूर्ण करून मॅच संपवली. हे त्याचे आयपीएलमधील सातवे शतक ठरले आणि त्याने ख्रिल गेलचा ( ६) विक्रम मोडला. राजस्थानने या विजयासह १२ गुण खात्यात जमा केले आणि Point Table च्या अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. या सामन्यातील सुनील नरीनचे शतक अन् दोन विकेट्सची मेहनत वाया गेली.
यशस्वी जैस्वालने ( १९) अपयशाचा पाढा पुन्हा वाचला. दुसऱ्या षटकात वैभव अरोराने त्याला ट्रॅप करून बाद केले. पाचव्या षटकात हर्षित राणाने RR चा कर्णधार संजू सॅमसनला ( १२) माघारी पाठवले. इम्पॅक्ट प्लेअर जॉस बटलर व रियान पराग यांनी डाव सावरला आणि २३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ८व्या षटकात ६, ४ खाल्यानंतर हर्षितने चतुर गोलंदाजी केली आणि रियान आणखी एक उत्तुंग फटका खेचण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३४ धावा केल्या आणि यंदाच्या पर्वात ३०० हून अधिक धावा करणारा विराटनंतर तो दुसरा फलंदाज ठरला. ९व्या षटकात सुनील नरीनने RR ला चौथा धक्का देताना ध्रुव जुरेलची ( २) विकेट मिळवली.
रोव्हमन पॉवेल व शिमरोन हेटमायर हे दोन हिटर असताना RR ने आर अश्विनला फलंदाजीत बढती दिली. त्यामुळे त्यांच्या धावांचा वेग मंदावला. अश्विन ११ चेंडूंत ८ धावा करून गेला आणि बटलरसह त्याने २२ चेंडूंत २१ धावा जोडल्या. वरुण चक्रवर्थीने पहिल्याच चेंडूवर हेटमायरला गोल्डन डकवर माघारी पाठवून KKR ला मोठे यश मिळवून दिले. राजस्थानाला ३६ चेंडूंत ९६ धावा करायच्या होत्या आणि सर्व आशा बटलरवरच होत्या. त्याने ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि १५ व्या षटकात १७ धावा कुटल्या. आंद्रे रसेल गोलंदाजीला आला आणि त्याच्या पहिल्याच षटकात १७ धावा चोपल्या गेल्या.
रोव्हमनने १७व्या षटकात नरीनचे ४,६,६, असे स्वागत केले, परंतु पाचव्या चेंडूवर नरीनने ही विकेट मिळवली. रोव्हमन १३ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावा चोपून गेला आणि त्याने १९ चेंडूंत ४६ धावा असे लक्ष्याच्या दिशेचे अंतर कमी केले. पुढच्या चेंडूवर ट्रेंट बोल्टचा झेल टाकला गेला. नरीनने ४ षटकांत ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने १८व्या षटकात १८ धावा दिल्या आणि १२ चेंडू २८ धावा असा सामना आला. १९व्या षटकात बटलरने १९ धावा कुटल्याने सामना RRच्या पारड्यात झुकला. वरुण चक्रवर्थीचा पहिला चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवल्यानंतर बटलरने तीन चेंडू निर्धाव खेळले. पाचव्या चेंडूवर २ धावा घेतल्यानंतर त्याच्या पायात क्रॅम्प आला. १ चेंडू १ धाव हवी असताना बटलरने चौकार खेचून थरारक विजय मिळवला.
बटलर ६० चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १०७ धावा केल्या आणि राजस्थानने २ विकेट्सने सामना जिंकला. आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठऱला. २०२० मध्ये राजस्थानने पंजाब किंग्सविरुद्ध २२४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. याच विक्रमाशी राजस्थानने आज बरोबरी केली.
तत्पूर्वी, Sunil Narine नावाचे वादळ कोलकाताच्या ईडन गार्डनवर पुन्हा एकदा घोंगावले. त्याने ५६ चेंडूंत १३ चौकार व ६ षटकारांसह १०९ धावा चोपल्या. चौथ्या षटकात फिल सॉल्ट ( १०) माघारी परतल्यानंतर नरीन व अंगक्रिश रघुवंशी ( ३० धावा, १८ चेंडू) यांनी ४३ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी केली. कर्णधार श्रेयस अय्यरला ( ११) युझवेंद्र चहलने पायचीत केले. पण, नरीन काही ऐकणारा नव्हता आणि १८व्या षटकात ट्रेंट बोल्टने अप्रतिम यॉर्कवर नरीनचा त्रिफळा उडवला. रिंकू सिंगने ९ चेंडूंत २० धावा चोपून कोलकाताला ६ बाद २२३ धावा उभारून दिल्या.
Web Title: IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : RR'R'! Thrilling win for Rajasthan, Sunil Narine's century goes in vain due to Jos Buttler's fantastic century, RR Table Toper
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.