ICC T20 World Cup 2024: आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून आपापल्या देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे आव्हान प्रत्येक देशातील खेळाडूसमोर आहे. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आयपीएल २०२४ ची स्पर्धा पार पडल्यानंतर लगेचच क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी करून आपापल्या राष्ट्रीय संघात जागा मिळवण्यासाठी सर्वच देशातील खेळाडू प्रयत्नशील आहेत. (T20 World Cup 2024 Team India) भारतीय संघाला आगामी स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. वन डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताच्या तोंडचा घास पळवला होता. त्यामुळे ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान रोहितसेनेसमोर असेल. (T20 World Cup News) चेन्नई सुपर किंग्जचा आघाडीचा फलंदाज शिवम दुबेने त्याच्या स्फोटक खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण क्रिकेट विश्वात घडणाऱ्या चालू घडामोडींवर सातत्याने भाष्य करत असतो. आता त्याने ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी शिवम दुबेचा भारताच्या निवडकर्त्यांनी विचार करायला हवा असे म्हटले आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले की, आताच्या घडीला फिरकीपटूंचा सामना करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत शिवम दुबे खूप आघाडीवर आहे. त्यामुळे मला वाटते की, ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय निवडकर्त्यांनी त्याच्यावर बारीक नजर ठेवायला हवी.
शिवम दुबेसाठी पठाणची बॅटिंग भारत ट्वेंटी-२० विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळेल असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच इरफान पठाणने आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ निवडला होता. त्याने काही युवा खेळाडूंना विश्वचषकाच्या संघात संधी द्यायला हवी असे सुचवले. पठाणने १२ सदस्यीय भारतीय संघ निवडला पण त्यात शिवम दुबेचे नाव नव्हते.
इरफानने निवडलेला भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, जितेश शर्मा, लोकेश राहुल, मोहसिन खान, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई.