Join us  

लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड यांनी एकच चूक केली; BCCI ची दंड म्हणून लाखोंची वसूली

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील लखनौ येथे शुक्रवारी झालेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा एकतर्फी झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 3:32 PM

Open in App

IPL 2024, LSG vs CSK : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील लखनौ येथे शुक्रवारी झालेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा एकतर्फी झाला. CSK चे १७७ धावांचे आव्हान LSG ने ८ विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात लखनौचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने ८२ धावांची मॅच विनिंग खेळी केली, तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड अपयशी ठरला. पण, या दोन्ही कर्णधारांकडून एक समान चूक झाली आणि BCCI  ने त्यांच्याकडून दंड म्हणून लाखो रुपयांची वसूली केली.

One Hand Sunner! रवींद्र जडेजाचा कॅच पाहून ऋतुराज थक्क्, जाँटी ऱ्होड्सनेही केलं कौतुक

अजिंक्य रहाणे ( ३६), मोईन अली ( ३०) यांच्यासह रवींद्र जडेजाने ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ५७ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने ९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २८ धावांची आतषबाजी केली आणि  चेन्नईने ६ बाद १७६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावा जोडून LSG चा विजय पक्का केला. क्विंटन ४३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावांवर बाद झाला. लोकेशही ५३ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. निकोलस पूरन ( २३) व मार्कस स्टॉयनिस ( ८) यांनी १९व्या षटकात सामना संपवला.  

या सामन्यात निर्धारीत वेळेत षटकं पूर्ण न केल्यामुळे लोकेश राहुल व ऋतुराज गायकवाड यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दोघांकडून प्रथमच अशी चूक झाल्यामुळे त्यांना प्रत्येकी १२ लाख रुपये दंड म्हणून भरावा लागला आहे. यांच्याकडून अशी चूक पुन्हा झाल्यास २४ लाखांचा दंड अन् तिसऱ्यांदा चुकल्यास एका सामन्याची बंदी त्यांच्यावर होईल.   

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाडलोकेश राहुललखनौ सुपर जायंट्स