IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये प्रथमच चेन्नई सुपर किंग्सचा संघ साधारण वाटला. फलंदाजीतही त्यांची आघाडीची फळी ढेपाळली, गोलंदाजांना लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी संधीच नाही दिली. पण, रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) फलंदाजीत खिंड लढवलीच, शिवाय वन हँड स्टनर झेल घेऊन सर्वांची वाहवाह मिळवली. जडेजाचा हा झेल पाहून CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाड व गोलंदाज मथिशा पथिराणा हे दोघंही अवाक् झाले, तर LSG चा फिल्डिंग कोच जाँटी ऱ्होड्सलाही टाळ्या वाजवणे नाही आवरले.
LSG च्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अजिंक्य रहाणे ( ३६), मोईन अली ( ३०) यांच्यासह रवींद्र जडेजाने ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ५७ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने ९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २८ धावांची आतषबाजी केली आणि चेन्नईने ६ बाद १७६ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावा जोडून LSG चा विजय पक्का केला. १५व्या षटकात CSKला पहिले यश मिळाले आणि मुस्ताफिजूर रहमानने ही विकेट मिळवून दिली. क्विंटन ४३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावांवर बाद झाला.
लोकेशही ५३ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. १८व्या षटकात पथिराणाच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजाने वाऱ्याच्या वेगाने हवेत झेप घेत अप्रतिम झेल टिपला. जाँटी ऱ्होड्सनेही या कॅचचे कौतुक केले. पण, निकोलस पूरन ( २३) व मार्कस स्टॉयनिस ( ८) यांनी १९व्या षटकात सामना संपवला. लखनौने २ बाद १८० धावा करून ८ विकेट्सने मॅच जिंकली.
Web Title: IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : Ravindra Jadeja takes a stunner to end a splendid knock from KL Rahul, check Ruturaj Gaikwad and Pathirana's reaction, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.