IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : लखनौ सुपर जायंट्सने रविवारी घरच्या मैदानावर उल्लेखनीय पुनरागमन करून १६३ धावांचा यशस्वी बचाव केला. गुजरात टायटन्सला शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. पण, यश ठाकूर ( 5-30) व कृणाल पांड्या ( ३-११) यांनी टिच्चून मारा करून मॅचला कलाटणी दिली. आयपीएल स्पर्धेतील LSGचा हा GT वरील पहिलाच विजय ठरला. यापूर्वी एकदाही लखनौला गुजरातला हरवता आले नव्हते.
शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून देताना पहिला पॉवर प्लेमध्ये ५४ धावा फलकावर चढवल्या. पण, यश ठाकूरने ही जोडी तोडताना शुबमनचा ( १९) त्रिफळा उडवला. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या केन विलियम्सनला ( १) रवी बिश्नोईने अविश्वसनीय झेल घेऊन माघारी पाठवले. त्यानंतर कृणाल पांड्याने एकाच षटकात दोन धक्के देताना साई सुदर्शनला (३१) व बी शरथला (२) माघारी पाठवले. बिनबाद ५४ वरून गुजरातची अवस्था ४ बाद ६१ अशी झाली. कृणालने तिसरी विकेट घेताना दर्शन नळकांडेला ( १२) माघारी पाठवत गुजरातला कोंडित पकडले.
विजय शंकर आजतरी खेळेल अशी आशा पुन्हा फेल गेली. यश ठाकूरने चतुराईने त्याची ( १७) विकेट मिळवली. त्याच षटकात राशिद खान ( ०) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट देऊन बसला आणि GT चा ७ वा फलंदाज तंबूत परतला. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट नवीन उल हकने १६व्या षटकात उमेश यादवला ( २) बाद केले. उत्तुंग उडालेला चेंडू क्विंटन डी कॉकने सहज टिपला. राहुल तेवाटियाने अखेरच्या षटकांत फटकेबाजीचा प्रयत्न केला, परंतु लखनौच्या गोलंदाजांनी कौशल्यपूर्ण मारा केला. १२ चेंडूंत ४४ धावा गुजरातला हव्या होत्या. पण, तेवाटिया ( ३०) यश ठाकूरच्या गोलंदाजीवर निकोलस पूरनच्या हाती झेल देऊन परतला. त्यानंतर आणखी एक विकेट घेऊन यशने त्याचे पंचक पूर्ण केले. गुजरातचा संपूर्ण संघ १३० धावांवर तंबूत परतला आणि लखनौ ३३ धावांनी सामना जिंकला. या विजयासह लखनौ ६ गुणांसह तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आणि चेन्नई सुपर किंग्स चौथ्या क्रमांकावर घसरले.
तत्पूर्वी, उमेश यादव ( २-२२) व दर्शन नळकांडे ( २-२१) यांनी LSGला डबल धक्के देताना गुजरात टायटन्सला पकड मिळवून दिली. क्विंटन डी कॉक व देवदत्त पडिक्कल यांना उमेशने माघारी पाठवले. लोकेश राहुल ( ३३) व मार्कस स्टॉयनिस ( ५८) यांनी LSG चा डाव सावरला होता, परंतु GT च्या गोलंदाजांनी त्यांच्या धावगतीवर अंकुश ठेवले होते. दर्शन नळकांडेने या दोन्ही सेट फलंदाजांना माघारी पाठवले. निकोलस पूरनने २२ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद ३२ धावा केल्या आणि लखनौला ५ बाद १६३ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : Lucknow Super Giants beat Gujarat titans by 33runs, first win over GT; Yash Thakur take 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.