Join us  

Sensational catch! रवी बिश्नोईने घेतला केनचा अविश्वसनीय झेल, ७ धावांत ४ विकेट्स Video 

लखनौ सुपर जायंट्सच्या १६३ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 10:23 PM

Open in App

IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : लखनौ सुपर जायंट्सच्या १६३ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण, बिनबाद ५४ वरून त्यांची गाडी ४ बाद ६१ अशी घसरल्याने सामन्यात रंगत आली.  रवी बिश्नोईने यंदाच्या आयपीएलमधील सर्वोत्तम झेल घेत केन विलियम्सनला माघारी पाठवले. त्यानंतर कृणाल पांड्याने दोन धक्के दिले.     

उमेश यादव ( २-२२) व दर्शन नळकांडे ( २-२१) यांनी लखनौ सुपर जायंट्सला डबल धक्के देताना गुजरात टायटन्सला पकड मिळवून दिली. क्विंटन डी कॉक व देवदत्त पडिक्कल यांना उमेशने माघारी पाठवले. लोकेश राहुल व मार्कस स्टॉयनिस यांनी LSG चा डाव सावरला होता, परंतु GT च्या गोलंदाजांनी त्यांच्या धावगतीवर अंकुश ठेवले होते. स्टॉयनिस व राहुल यांनी ७३ धावांची भागीदारी केली. पण, दर्शन नळकांडेने या दोन्ही सेट फलंदाजांना माघारी पाठवले. राहुल ३३ ( ३१ चेंडू) धावांवर, तर स्टॉयनिस ४३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांवर बाद झाला. आयुष बदोनी २० धावांवर माघारी परतला. निकोलस पूरनने २२ चेंडूंत ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या आणि लखनौला ५ बाद १६३ धावांपर्यंत पोहोचवले.

शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून देताना पहिला पॉवर प्लेमध्ये ५४ धावा फलकावर चढवल्या. यश ठाकूरने ही जोडी तोडताना शुबमनचा ( १९) त्रिफळा उडवला. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या केन विलियम्सनला ( १) रवी बिश्नोईने अविश्वसनीय झेल घेऊन माघारी पाठवले. बिश्नोईने त्याच्याच गोलंदाजीवर हवेत झेपावत रिटर्न कॅच घेतला. त्यानंतर कृणाल पांड्याने पुढच्या षटकात साई सुदर्शनला ३१ ( २३ चेंडू) धावांवर बाद करून गुजरातला ५६ धावांवर तिसरा धक्का दिला. कृणालने त्याच षटकात बी शरथला माघारी पाठवले. 

टॅग्स :आयपीएल २०२४लखनौ सुपर जायंट्सगुजरात टायटन्सकेन विल्यमसन