Join us  

रमणदीप सिंगचा 'उडता' झेल पाहून किंग खान खूश; LSG ला धक्क्यांमागून धक्के, Video

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ईडन गार्डनवर  रविवारी लखनौवर विजय नोंदविण्याच्या इराद्याने खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 4:14 PM

Open in App

IPL 2024 : Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Marathi - दोनवेळेचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ईडन गार्डनवर  रविवारी लखनौवर विजय नोंदविण्याच्या इराद्याने खेळणार आहे. ईडनवर यजमानांचा हा पहिला सामना असून, यंदा प्ले ऑफ गाठण्यासाठी हा विजय महत्त्वाचा ठरू शकतो, याची जाणीव मेंटॉर गौतम गंभीरला आहेच. दोन्ही संघांनी यंदा प्रत्येकी तीन-तीन विजय नोंदविले आहेत. KKR ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

क्विंटन डी कॉक ( १०) व लोकेश राहुल यांनी LSG ला आशा दाखवली होती, परंतु वैभव अरोराने दुसऱ्या षटकात क्विंटनला माघारी पाठवले. आज देवदत्त पडिक्कलला बाकावर बसवून LSG ने शेमार जोसेफला पदार्पणाची संधी दिली. शेमारने वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी विजय मिळवून दिला होता. त्यानंतर तो चर्चेत आला. दीपक हुडाला आज आघाडीवर फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आणि तो छाप पाडेल असा विश्वास होता. पण, मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर रमनदीप सिंगने बॅकवर्ड पॉईंटवर अफलातून झेल घेतला. KKR चा सहमालक शाहरुख खानही या कॅचने आनंदी झाला. 

Point Table मधील संघांची काय अवस्था?

KKR चा संघ ४ सामन्यांत ३ विजयांसह तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान १० गुणांसह अव्वल आहे.  गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स व ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी ६ सामने खेळून झाले आहेत. GT ने ३ विजय व ३ पराभव पत्करले आहेत आणि ते सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना उर्वरित ८ सामन्यांत १६ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी पाच विजय आवश्यक आहेत. 

पंजाब किंग्सला ६ पैकी २ सामने जिंकता आलेले आहेत. त्यांना मागील सामना अवघ्या २ धावांनी गमवावा लागला, तसे नसते झाले तर ते GT सोबत असते. पण, सध्या त्यांची अवस्था DC सारखी आहे. PBKS व DC यांना आता उर्वरित ८ सामन्यांत किमान ५ विजय हवे आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ६ मध्ये १ विजय मिळवू शकले आहेत आणि त्यांना ८ पैकी ६ सामने जिंकणे गरजेचे आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सलखनौ सुपर जायंट्स