Join us  

KKR vs LSG Live : फिल सॉल्ट-श्रेयस अय्यर यांची मॅच विनिंग भागीदारी; कोलकाताची लखनौवर बाजी 

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 6:55 PM

Open in App

IPL 2024 : Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Marathi - कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. पाच सामन्यांतील KKR चा चौथा विजय ठरला आणि ८ गुणांसह त्यांची दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत झाली आहे. LSG चा सहा सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. मिचेल स्टार्कने आज ३ विकेट्स घेतल्या आणि काल मेंटॉर गौतम गंभीरने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. 

KKR च्या गोलंदाजांनी चांगला मारा करून LSG च्या धावांवर अंकुश ठेवला होता. मिचेल स्टार्कने २०व्या षटकात दोन विकेट्स घेऊन त्याच्या ४ षटकांत २८ धावांसह तीन विकेट्स पूर्ण केल्या. वैभव अरोरा, सुनील नरीन, वरुण चक्रवर्थी व आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेऊन LSG ला दडपणात राखले होते. पण, निकोलस पूरनने ते झुगारले आणि ३२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावा केल्या. LSG कडून कर्णधार लोकेश राहुल ( ३९) व आयुष बदोनी ( २९) यांनी त्यानंतर सर्वाधिक धावा केल्या. निकोलसच्या फटकेबाजीने लखनौला ७ बाद १६१ धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला. 

पदार्पणवीर शमार जोसेफच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यश ठाकूरने फिल सॉल्टचा झेल टाकला. पण, तो नो बॉलही होता. त्यानंतर जोसेफची लय बिघडली आणि तो एक चेंडू पूर्ण करण्यासाठी जोसेफने १३ धावा दिल्या. त्याच्या पहिल्या षटकात २२ धावा कुटल्या गेल्या. पण, मोहसिन खानने त्याच्या पहिल्या षटकात सुनील नरीनला ( ६) बाद करून KKR ला पहिला झटका दिला. मोहसिनने त्याच्या दुसऱ्या षटकात अंगक्रिश रघुवंशीला ( ७) सहज माघारी पाठवले. शमरने त्याच्या पुढील षटकात चांगले पुनरागमन केले आणि त्याच्या तिसऱ्या षटकात फिल सॉल्टचा झेल LSG च्या खेळाडूने टाकला.  

शमारच्या तीन षटकांत ३ झेल सुटले आणि सॉल्टचे नशीब आज तगडे राहिले. सॉल्टने २६ चेंडूंत अर्धशतक झळकावताना KKRला ९.४ षटकांत शतकपार नेले. दिशाहीन गोलंदाजीचा फटका LSG ला बसला आणि सॉल्ट व श्रेयस अय्यर यांनी मॅच विनिंग भागीदारी केली.  श्रेयसने नाबाद ३८ धावा केल्या आणि संघाला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला. सॉल्ट ४७ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह ८९ धावांवर नाबाद राहिला. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सलखनौ सुपर जायंट्स