KKR vs LSG Live : निकोलस पूरनची आतषबाजी पाहून Suhana Khanचा चेहरा पडला; LSG ने कमबॅक केला

निकोलस पूरन याने शेवटच्या षटकांत दमदार फटकेबाजी करून LSG ला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:15 PM2024-04-14T17:15:10+5:302024-04-14T17:18:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Marathi -  Suhana Khan's face fell after seeing Nicholas Pooran's ( 45) fireworks; LSG made a comeback, set 162 runs target for KKR | KKR vs LSG Live : निकोलस पूरनची आतषबाजी पाहून Suhana Khanचा चेहरा पडला; LSG ने कमबॅक केला

KKR vs LSG Live : निकोलस पूरनची आतषबाजी पाहून Suhana Khanचा चेहरा पडला; LSG ने कमबॅक केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Marathi - कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले. लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांना KKR च्या गोलंदाजांसमोर संघर्ष करावा लागला. पण, निकोलस पूरन याने शेवटच्या षटकांत दमदार फटकेबाजी करून LSG ला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. लखनौचे हे पुनरागमन  पाहून कोलकाताचा सह मालक शाहरुख खान याची कन्या सुहाना खान हिचा चेहरा पडला. 


KKR ने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात क्विंटन डी कॉक ( १०) याला वैभव अरोराने बाद केले. फलंदाजीत बढती मिळूनही दीपक हुडा ( ८) फेल गेला आणि रमणदीप सिंगने बॅकवर्ड पॉईंटवर अफलातून झेल घेतला.  कर्णधार लोकेश राहुल चांगला खेळत होता आणि ११व्या षटकात आंद्रे रसेलचे स्वागत त्याने षटकाराने केले. पण, दुसऱ्या चेंडूवर मारलेला पुल शॉट फसला आणि लोकेश २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर झेलबाद झाला. दोन चौकारांनी खाते उघडणारा मार्कस स्टॉयनिस ( १०) वरुण चक्रवर्थीच्या गुगलीवर विचित्र पद्धतीने बाद झाला. स्टॉयनिसच्या बॅटला लागून चेंडू पॅडवर आदळला आणि यष्टिरक्षक फिल सॉल्टने चतुराईने झेल टिपला. आयुष बदोनी ( २९) बाद झाल्याने लखनौ अडचणीत सापडले.  

खेळपट्टी फिरकीला मदत करत होती आणि जलदगती गोलंदाजांनी टाकलेला चेंडूही बॅटवर संथ येत होता. त्यामुळे LSG चे फलंदाज प्रयत्न करूनही मोठे फटके मारू शकत नव्हते. निकोलसचे उत्तुंग षटकार पाहून सुहाना खान निराश झाली. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक १९ षटकार निकोलसच्या नावावर जमा झाले आहेत. २०व्या षटकात स्टार्कने त्याला बाद केले. निकोलस ३२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावांवर बाद झाला.  स्टार्कने शेवटचं षटक चांगले फेकले, त्याने २ विकेट्स घेत केवळ ६ धावा दिल्या. लखनौला ७ बाद १६१ धावा करता आल्या. 

Web Title: IPL 2024 : Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Marathi -  Suhana Khan's face fell after seeing Nicholas Pooran's ( 45) fireworks; LSG made a comeback, set 162 runs target for KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.