आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

मुंबई इंडियन्सच्या ७ बाद १४४ धावांचे लक्ष्य लखनौ सुपर जायंट्सने १९.२ षटकांत ६ बाद १४५ धावा करून पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:37 PM2024-04-30T23:37:14+5:302024-04-30T23:37:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : I think losing early wickets is tough to recover from and that's what we couldn't do it (recover) today, Hardik Pandya | आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने १० सामन्यांत सातवा पराभव आज पत्करला आणि त्यांचे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मुंबई इंडियन्सच्या ७ बाद १४४ धावांचे लक्ष्य लखनौ सुपर जायंट्सने १९.२ षटकांत ६ बाद १४५ धावा करून पार केले.  LSG ने १० सामन्यांतील सहावा विजय मिळवून १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला.  


LSG च्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवताना MI ला ७ बाद १४४ धावांपर्यंत रोखले. रोहित शर्मा ( ४), सूर्यकुमार यादव ( १०), तिलक वर्मा ( ७) व हार्दिक पांड्या ( ०) हे धावफलकावर २७ धावा असताना तंबूत परतले. इशान किशन ३२, नेहल वढेरा ४६ आणि टीम डेव्हिडने १८ चेंडूंत नाबाद ३५ धावा चोपून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात लखनौकडून लोकेश राहुल ( २८), मार्कस स्टॉयनिस ( ६२) यांनी संघाचा पाया मजबूत केला. दीपक हुडा ( १८) व निकोलस पूरन ( नाबाद १४) यांनी सामना संपवला. लखनौने १९.२ षटकांत ६ बाद १४५ धावा करून विजय मिळवून दिला. 

हार्दिक पांड्या काय म्हणाला? 
पॉवर प्लेमध्ये विकेट गमावल्यानंतर कमबॅक करणे अवघड असते... आज आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची गरज होती, परंतु दुर्दैवाने.... विकेट फलंदाजीसाठी चांगली होती. अजून बॉल बघून फटके मारायला हवे होते.  आम्ही त्या चेंडूवर फटके मारण्यापासून चूकलो आणि बाद झालो. आत्तापर्यंतचा हंगाम असाच होता. या खेळातून खूप काही शिकण्यासारखे आहे. ते विलक्षण झाले आहे. मला वाटते की त्याने नेहल वढेराने गेल्या वर्षीही चांगली कामगिरी केली होती आणि त्याला याआधी (टूर्नामेंटमध्ये) संधी मिळू शकली नाही, परंतु तो खूप आयपीएल खेळेल आणि शेवटी भारताचे प्रतिनिधित्व करेल. 

Web Title: IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : I think losing early wickets is tough to recover from and that's what we couldn't do it (recover) today, Hardik Pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.