IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : लखनौ सुपर जायंट्ससमोर इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव हे २७ धावांवर माघारी परतले. इशान किशन व नेहल वढेरा यांनी संघर्ष केला. टीम डेव्हिडनेही शेवटच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली.
इशान किशन व रोहित शर्मा यांना LSG च्या गोलंदाजांनी दडपणात ठेवले. मोहसिन खानने दुसऱ्याच षटकात रोहितला ( ४ ) बाद केले आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवही ६ चेंडूंत १० धावांवर स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन परतला. लोकेशने अचूक DRS घेतला. LSG च्या गोलंदाजांनी MI च्या धावगतीला ब्रेक लावला होता, मुंबईला चौकार मिळणेही अवघड होऊन बसले होते. तिलक वर्मा ( ७) सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रन आऊट झाला. हार्दिक पांड्याला गोल्डन डकवर नवीन उल हकने माघारी पाठवून मुंबईची अवस्था ४ बाद २२ अशी केली. पॉवर प्लेमध्ये मुंबईला ४ बाद २८ धावाच करता आल्या आणि यंदाच्या पर्वातील एखाद्या संघाची ही दुसरी खराब कामगिरी आहे. PBKS ला SRH विरुद्ध ३ बाद २७ धावा करता आल्या होत्या. मुंबईला १० षटकांत ४ बाद ५७ धावांपर्यंत मजल मारता आली.
नेहल वढेरा व इशान किशन यांनी पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली होती, परंतु रवी बिश्नोईने गुगलीवर ही जोडी तोडली. इशान ३२ धावांवर झेलबाद झाल्याने MI ला ८० धावांवर पहिला धक्का बसला. नेहल चांगली फटकेबाजी करत होता, परंतु मोहसिन खानने अप्रतिम यॉर्कवर त्याचा त्रिफळा उडवला. नेहल ४१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. १९व्या षटकात मयांक यादवने मोहम्मद नबीचा ( १) त्रिफळा उडवला. टीम डेव्हिडने १८ चेंडूंत नाबाद ३५ धावा करून मुंबईला ७ बाद १४४ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : Ishan Kishan ( 32), Nehal Wadhera ( 46), Tim David ( 35 ); MI set 145 runs target to LSG
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.