Join us  

वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 

९ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवल्यामुळे मुंबई इंडियन्सला प्ले ऑफसाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 8:06 PM

Open in App

IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : ९ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवल्यामुळे मुंबई इंडियन्सला प्ले ऑफसाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना आव्हानात्मक आहे. LSG ९ सामन्यांत पाच विजयांसह १० गुण घेत पाचव्या क्रमांकावर आहे आणि तेही प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के करण्यासाठी उत्सुक आहेत. उभय संघांमध्ये झालेल्या ४ पैकी ३ सामन्यांत MI ची हार झाली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी संघात निवड झालेल्या हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) कामगिरीवर सर्वांचे लक्ष होते, परंतु तो गोल्डन डकवर परतला. 

LSG कडून षटकारांची फिफ्टी साजरी करण्यासाठी लोकेश राहुलला २ उत्तुंग फटके हवे आहेत, तर MI कडून पन्नास विकेट्स पूर्ण करण्यासाठी हार्दिक पांड्याला ४ बळी घ्यावे लागणार आहेत. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. LSG च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आज अर्शीन कुलकर्णी व एस्टन टर्नर यांना पदार्पणाची संधी मिळाली, शिवाय क्विंटन डी कॉक आजच्या सामन्याला मुकला आहे आणि मयांक यादवचे पुनरागमन झाले आहे. MI च्या ताफ्यात ल्यूक वूडच्या जागी गेराल्ड कोएत्झीचे पुनरागमन होत आहे.  

इशान किशन व रोहित शर्मा यांना मार्कस स्टॉयनिसने पहिल्या षटकात दबावात ठेवले. मोहसिन खानच्या पुढील षटकात रोहितने स्वीप मारून चौकार मिळवला, परंतु LSG च्या गोलंदाजाने चतुराईने मारा केला. पुढच्याच चेंडूवर रोहितला ( ४) शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला स्टॉयनिसच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. रोहितच्या विकेटनंतर रितिका नाराज दिसली. वाढदिवशी रोहित मोठी खेळी करेल अशी अनेकांची अपेक्षा फेल ठरली. सूर्यकुमार यादवही ६ चेंडूंत १० धावांवर स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन परतला. लोकेशने अचूक DRS घेतला. LSG च्या गोलंदाजांनी MI च्या धावगतीला ब्रेक लावला होता, मुंबईला चौकार मिळणेही अवघड होऊन बसले होते.

तिलक वर्मा ( ७) सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रन आऊट झाला. हार्दिक पांड्याला गोल्डन डकवर नवीन उल हकने माघारी पाठवून मुंबईची अवस्था ४ बाद २२ अशी केली.

 

टॅग्स :आयपीएल २०२४हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स