IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सने विजय मिळवला. पण, या सामन्यात एक वादग्रस्त निर्णय दिल्याची चर्चा रंगली आहे. LSG ला विजयासाठी १३ धावा हव्या असताना आयुष बदोनीला बाद दिल्यामुळे वाद निर्माण झाला. डग आऊटमध्ये बसलेला कर्णधार लोकेश राहुल व मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. समालोचक व माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने तीव्र नाराजी व्यक्त केली.
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला...
LSG च्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवताना MI ला ७ बाद १४४ धावांपर्यंत रोखले. रोहित शर्मा ( ४), सूर्यकुमार यादव ( १०), तिलक वर्मा ( ७) व हार्दिक पांड्या ( ०) हे धावफलकावर २७ धावा असताना तंबूत परतले. इशान किशन ३२, नेहल वढेरा ४६ आणि टीम डेव्हिडने १८ चेंडूंत नाबाद ३५ धावा चोपून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात लखनौकडून लोकेश राहुल ( २८), मार्कस स्टॉयनिस ( ६२) यांनी संघाचा पाया मजबूत केला. दीपक हुडा ( १८) व निकोलस पूरन ( नाबाद १४) यांनी सामना संपवला. लखनौने १९.२ षटकांत ६ बाद १४५ धावा करून विजय मिळवून दिला.
Umpire चा वादग्रस्त निर्णय... १२ चेंडूंत १३ धावा हव्या असताना बदोनी रन आऊट झाला. इशान किशन पहिल्या प्रयत्नात बेल्स उडवण्यात अपयशी ठरला होता, परंतु त्याने दुसऱ्या प्रयत्नात बेल्स उडवल्या. तोपर्यंत बदोनीची बॅटने क्रिज ओलांडली होती, परंतु चेंडू व बेल्सचा संपर्क झाला, तेव्हा बदोनीच्या बॅटचा दांडा किंचित हवेत आल्याचा दिसला आणि तिसऱ्या अम्पायरने बाद दिले. लोकेश राहुल या निर्णयावर नाराज दिसला आणि समालोचक
इरफान पठाण यानेही तीव्र संताप व्यक्त केला.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने या निर्णयावर संताप व्यक्त केला.
Web Title: IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : Out or Not Out? Ishan, what are you doing? He misses the first attempt at the stumps but manages the second, The bat is in the air, Ex player Irfan Pathan not happy with decision, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.