मुंबई: गतविजेता चेन्नई आणि यजमान मुंबई आयपीएल-१७ मध्ये रविवारी वानखेडे स्टेडियमवर भिडतील तेव्हा दिग्गज महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीकडे चाहत्यांच्या नजरा असतील. या मैदानावर धोनीचा हा अखेरचा सामना ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोव्हेंबर २००५ पासून कोणत्याही संघाकडून केवळ खेळाडू म्हणून मुंबईत खेळण्याची ही त्याची पहिली वेळ असेल. ४२ वर्षांचा माही यष्टीमागे युवांना लाजविणारी कामगिरी करतो. मुंबईविरुद्ध पाचपैकी चार साामने चेन्नईने जिंकले. यंदा दोन्ही संघांनी कर्णधार बदलले तरी मैदानावरील चुरस कायम आहे.
मुंबई संघ
- ईशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांना रोखणे चेन्नईच्या गोलंदाजांपुढे मोठी डोकेदुखी ठरेल.
- वेगवान जसप्रीत बुमराह याच्यासह मुंबईचा गोलंदाजी मारा आता फॉर्ममध्ये परतला आहे. कर्णधार हार्दिक मात्र चमक दाखवू शकलेला नाही.
चेन्नई संघ
- कर्णधार ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि धोनी या सर्वांकडून धडाकेबाज फलंदाजीची अपेक्षा बाळगता येईल.
- गोलंदाजीची भिस्त मुस्तफिजूर रहमान, जडेजा, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांच्यावर असेल.
Web Title: IPL 2024 MI vs CSK Hardik pandya's hat-trick for Mumbai win Strong challenge from CSK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.