Join us  

कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले

पावसाच्या व्यत्ययामुळे विलंबाने सुरु झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सना सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:46 PM

Open in App

IPL 2024, MI vs KKR Marathi Live : पावसाच्या व्यत्ययामुळे विलंबाने सुरु झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सना सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. जसप्रीत बुमराह व नुवान तुषारा यांनी पहिल्या दोन षटकांत मुंबई इंडियन्सला यश मिळवून दिले. पण, वेंकटेश अय्यर, नितीश राणा व आंद्रे रसेल यांनी चांगली फटकेबाजी केली. १६ षटकांत मुंबई इंडियन्ससमोर चांगले आव्हान उभे केले. 

नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video

आयपीएल २०२४ मधील KKR vs MI सामना पावसामुळे सव्वा नऊ वाजता सुरू झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच चेंडूवर सुनील नरीनचा त्रिफळा उडवला. KKR चा सलामीवीर स्तब्ध उभा राहिला आणि बुमराहने टाकलेला चेंडू यष्टिंचा वेध घेऊन गेला. अंशुल कंबोजच्या पहिल्या षटकात १० धावा मिळाल्याने KKR वरील दडपण थोडे कमी झाले. पण, कंबोजने पुढील षटकात KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर ( ७) याचा त्रिफळा उडवून ४० धावांवर तिसरा धक्का दिला.   नितीश राणा आयपीएल २०२४ मधील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. दुखापतीमुळे त्याला बाकावर बसून रहावे लागले होते. KKR ने पॉवर प्लेमध्ये ३ बाद ४५ धावा केल्या. ८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पियूष चावलाने MI ला यश मिळवून दिले आणि वेंकटेश २१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर झेलबाद झाला. १२व्या षटकात नितीश २३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर रन आऊट झाला, तिलक वर्माने अचूक थ्रो करून KKR ला धक्का दिला. पियूषने पुढच्या षटकात आंद्रे रसेलला ( २३) बाद केले. १२ चेंडूंत २० धावा करणाऱ्या रिंकू सिंगला शेवटच्या षटकात जसप्रीतने माघारी पाठवले. रमणदीपने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून कोलकाताला ७ बाद १५७ धावांपर्यंत पोहोचवले. 

टॅग्स :आयपीएल २०२४जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स