IPL 2024, MI vs KKR Marathi Live : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन्ही सलामीवीरांना सात चेंडूत माघारी पाठवून सकारात्मक सुरुवात करून दिली. नुवान तुषाराच्या पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टने षटकार खेचल्यानंतर KKR सुसाट सुटेल असे वाटले होते. पण, तुषाराने त्याला माघारी पाठवले आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पहिल्याच चेंडूवर मोठे यश मिळवून दिले. त्याने टाकलेला चेंडू सुनील नरीनला स्तब्ध करून गेला. बेल्स उडताना पाहण्या पलिकडे फलंदाजाकडे काहीच पर्यात उरला नाही.
आयपीएल २०२४ मधील KKR vs MI सामना पावसामुळे सव्वा नऊ वाजता सुरू झाला. पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला होता आणि त्यामुळे जवळपास पावणे दोन तासांनी मॅच सुरू झाली. प्ले ऑफमध्ये जागा पक्की करण्यासाठी KKR ला फक्त १ विजय हवा आहे, तेच MI आधीच स्पर्धेतून बाद झाले आहेत. कोलकाताने ११ सामन्यांत ८ विजय मिळवले आहेत आणि १६ गुणांसह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. ८.४५ ला खेळपट्टीची पाहणी केली गेली. ९ वाजता टॉस होऊन सव्वानऊ वाजता मॅच सुरू होईल, परंतु दोन्ही संघाना प्रत्येकी १६-१६ षटके खेळायला मिळतील. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईने पुन्हा एकदा रोहित शर्माला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आज खेळवण्याचा निर्णय घेतला.
१ ते ५ षटकांचा पॉवर प्ले आजच्या सामन्यात असेल... एकाच गोलंदाजाला ४ षटकं, तर ४ गोलंदाज प्रत्येकी ३ षटकं टाकू शकतात. नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच चेंडूवर सुनील नरीनचा त्रिफळा उडवला. KKR चा सलामीवीर स्तब्ध उभा राहिला आणि बुमराहने टाकलेला चेंडू यष्टिंचा वेध घेऊन गेला.
Web Title: IPL 2024, MI vs KKR Marathi Live : What a ball by Boom Boom; Jasprit Bumrah cleaned up Sunil Narine for a golden duck, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.