Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना हा करो या मरो परिस्थितीतील आहे. तब्बल १० सामने खेळल्यानंतरही मुंबईच्या संघाला केवळ ३ सामने जिंकता आलेले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ ६ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. मुंबईच्या संघाला जर प्ले ऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर त्यासाठी त्यांना आजचे आणि यापुढे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. संघात मोहम्मद नबीच्या जागी नमन धीर याला संधी देण्यात आली आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, कर्णधार पांड्याने नवा डाव टाकला असून, रोहित शर्माचे नाव प्लेईंग XI मधून गायब करण्यात आले आहे. त्याला प्लेईंग XI मध्ये घेतलेले नसले तरी इम्पॅक्ट प्लेयर्समध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स- इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहाल वढेरा, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा / इम्पॅक्ट प्लेयर- रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड
कोलकाता नाईट रायडर्स- फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती / इम्पॅक्ट प्लेयर- चेतन साकारिया, अनुकुल रॉय, शेरफेन रदरफोर्ड, केएस भरत, मनीष पांडे