Join us  

Arjun Tendulkar ने उगाच पंगा घेतला अन् मग मार्कस स्टॉयनिसने इंगा दाखवला, Video 

नुवान तुषाराने तिसऱ्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला माघारी पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 8:01 PM

Open in App

IPL 2024, MI vs LSG Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये शेवटचा साखळी सामना खेळायला मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. नुवान तुषाराने तिसऱ्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहच्या जागी संधी मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) दुसऱ्या षटकात चांगला मारा केला. पण, आक्रमकता दाखवण्याच्या प्रयत्नात त्याने मार्कस स्टॉयनिसला ( Marcus Stoinis ) टशन दिली. त्यानंतर LSG च्या फलंदाजाची सटकली अन् त्याने MI च्या गोलंदाजांची धुलाई केली...  त्याने ५ खणखणीत चौकार खेचून २६ धावांपर्यंत मजल मारली.

MI घरच्या मैदानावर शेवटचा साखळी सामना खेळतोय आणि हार्दिकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली यंदा Mumbai Indians ला सपशेल अपयश आले आहे. १३ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ते ८ गुणांसह तालिकेत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत. LSG ने १३ सामन्यांत ६ विजय मिळवले आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी दिली गेली आहे. तिलक वर्मा दुखापतग्रस्त  आहे आणि डेव्हॉल्ड ब्रेव्हिसला संधी  दिली आहे. टीम डेव्हिडही बाहेर आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता जसप्रीतला विश्रांती दिली गेली आहे. रोहित शर्मा आजही इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघासोबत आहे. 

बऱ्याच दिवसांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेला देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या चेंडूवर नुवान तुषाराने पायचीत केले. अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या षटकात मार्कस स्टॉयनिसला दडपणाखाली ठेवले होते आणि तिसऱ्या चेंडूवर पायचीतची जोरदार अपीलही झाली होती. मैदानावरील अम्पायरचा बाद हा निर्णय तिसऱ्या अम्पायरने बदलल्याने अर्जुनला विकेट नाही मिळाली. अर्जुनच्या अपीलवर रोहित शर्माही आनंदी दिसला आणि कॅमेरामनने त्याचा तो आनंद टिपला. अर्जुनच्या शेवटच्या चेंडूवर स्टॉयनिसने सरळ फटका खेळला.. तो चेंडू उचलून अर्जुनने स्टॉयनिसच्या दिशेने फेकण्याची अॅक्शन केली आणि हे पाहून स्टॉयनिसही थक्क झाला. अर्जुनची आक्रमकता पाहून सारे चकित झाले.   

टॅग्स :आयपीएल २०२४अर्जुन तेंडुलकरमुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्स