मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ

IPL 2024, MI vs LSG Live Marathi :मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या शेवटच्या साखळी सामन्यातही पराभवाचे तोंड पाहावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 12:08 AM2024-05-18T00:08:18+5:302024-05-18T00:16:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Mumbai Indians' embarrassing defeat, stay last place in Point Table! LSG still in playoff race | मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ

मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, MI vs LSG Live Marathi :  मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या शेवटच्या साखळी सामन्यातही पराभवाचे तोंड पाहावे लागले. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत रोहित शर्माने वानखेडेवर अर्धशतक झळकावून MI ला सामन्यात ठेवले होते. पण, बिनबाद ८८ वरून ५ बाद १२० अशी त्यांची अवस्था झाली आणि LSG ने मॅच फिरवली. मुंबईला १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ८ गुणांसह दहाव्या क्रमांकावर समाधानी रहावे लागले. लखनौने विजय मिळवून १४ गुण कमावले खरे, परंतु त्यांना नेट रन रेटमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले. आता CSK vs RCB सामन्यातून प्ले ऑफचा चौथा संघ मिळेल. 

निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?


रोहित शर्मा व डेवॉल्ड ब्रेव्हिस ही जोडी सलामीला आली आणि दोघांनी ३.५ षटकांत ३३ धावा फलकावर चढवल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. १०.५० वाजता सामना पुन्हा सुरू झाला आणि रोहितची आतषबाजी पाहायला मिळाली. त्याने २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ब्रेव्हिससह त्याने ८.४ षटकांत ८८ धावा चोपल्या. नवीन उल हकच्या फुलटॉसवर ब्रेव्हिस ( २३) झेलबाद झाला.  रोहितने ५ वर्षांनंतर आयपीएलच्या एका पर्वात ४०० धावा पूर्ण केल्या. कृणाल पांड्याच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव भोपळ्यावर बाद झाला. रवी बिश्नोईने सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. मुंबईने पहिल्या १० षटकांत २ बाद ९२ धावा चढवल्या आणि त्यांना पुढील ६० चेंडूंत १२३ धावा करायच्या होत्या.


पटापट दोन विकेट्स गेल्याने रोहितवर दडपण आले होते आणि रवी बिश्नोईने याचाच फायदा उचलून ही विकेट मिळवली. रोहित ३८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ६८ धावांवर झेलबाद झाला. रोहित माघारी जाताना सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या, परंतु हार्दिक पांड्या मैदानावर येताच त्याच्या नावावने Boo Booo केले. हार्दिकने १३ चेंडूंत १६ धावा केल्या आणि तो बाद झाल्यावरही boo सुरूच होते. त्यामुळे लोकेश राहुल नाराज झाला आणि त्यांनी प्रेक्षकांना हे थांबवण्यास सांगितले. ८८ वर पहिली विकेट पडल्यानंतर मुंबईने पुढील चार फलंदाज ३२ धावांत गमावले. नेहाल वढेरा ( १ ) धावांवर तंबूत परतला. सामना मुंबईच्या हातून पूर्ण निसटला होता आणि ३४ चेंडूंत ९५ धावा त्यांना करायच्या होत्या. 


१८ चेंडूंत ६६ धावा हव्या असताना नमन धीर ( २७) झेलबाद झाला, परंतु नवीन उल हकचा तो चेंडू नो बॉल ठरला. नमन व इशान किशन यांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. नमनने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि ५ चेंडूंत २८ धावा असा सामना जवळ आणला. २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कृणाल पांड्याने अप्रतिम कौशल्य दाखवताना नमनचा षटकार रोखला. त्यामुळे मुंबईला १ धावच मिळाली. पुढच्या चेंडूवर इशानचा ( १४) त्रिफळा उडाला. आता ३ चेंडूंत २६ या अशक्य धावा मुंबईला करायच्या होत्या. मुंबईला २० षटकांत ६ बाद १९६ धावा करता आल्या आणि लखनौने १८ धावांनी सामना जिंकला. नमन २८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६२ धावांवर नाबाद राहिला. 


तत्पूर्वी, निकोलस पूरन व लोकेश राहुल यांच्या १०९ धावांच्या महत्त्वाच्या भागीदारीच्या जोरावर LSG ने ६ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. निकोलसने २९ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह ७५ धावा केल्या. लोकेशने ४१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. नुवान तुषाराने २८ धावांत ३, तर पियुष चावलाने २९ धावांत ३ विकेट्स पूर्ण केल्या. तुषाराने १७व्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या षटकावर विकेट घेतली, ततर पियुषने १८व्या षटकात विकेट घेऊन संघाची हॅटट्रिक पूर्ण केली.

 

Web Title: IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Mumbai Indians' embarrassing defeat, stay last place in Point Table! LSG still in playoff race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.