IPL 2024, MI vs LSG Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात फार चांगली झाली नव्हती आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी त्यांचे ३ फलंदाज ६९ धावांवर माघारी पाठवले. पण, कर्णधार लोकेश राहुल व निकोलस पूरन यांनी शतकी भागीदारी करून LSG ला मोठी धावसंख्या उभारून दिली. निकोलसच्या विकेटनंतर मुंबईने सलग तीन विकेट्स घेऊन संघाची हॅटट्रिक पूर्ण केली. यात लोकेशहीची विकेट होती.
Arjun Tendulkar ने उगाच पंगा घेतला अन् मग मार्कस स्टॉयनिसने इंगा दाखवला, Video
हार्दिकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि नुवान तुषाराने पहिल्याच षटकात LSG ला धक्का दिला. देवदत्त पडिक्कल भोपळ्यावर पायचीत झाला. संधी मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या षटकात मार्कस स्टॉयनिसविरुद्ध चांगली आक्रमकता दाखवली. पण, त्यानंतर लखनौच्या पलंदाजाने मुंबईच्या अन्य गोलंदाजांची धुलाई केली. पण, सहाव्या षटकाता पियूष चावलाने MI ला ही विकेट मिळवून दिली. स्टॉयनिस २२ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने २८ धावांवर पायचीत झाला. पियूषच्या या षटकात लोकेश राहुलने दोन षटकार खेचले. दहाव्या षटकात चावलाने पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यात दीपक हुडाला फसवले ( ११) नेहाल वढेराने अफलातून झेल घेतला. LSG च्या १० षटकांत ३ बाद ६९ धावा झाल्या.
कृणाल पांड्या ( १२) व आयुष बदोनी ( २२) यांनी अखेरच्या षटकांत चांगली फलंदाजी करून संघाला ६ बाद २१४ धावांपर्यंत पोहोचवले.