Mumbai Indians Probable Playing XI, Changes in Team, IPL 2024 MI vs LSG: मुंबई इंडियन्सचा संघ आज लखनौ सुपर जायंट्स संघाशी भिडणार आहे. लखनौच्या एकाना स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. मुंबईच्या संघाने ९ पैकी केवळ ३ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हा संघ स्पर्धेतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला उर्वरित सर्व सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मुंबईला आज लखनौला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करायचे असेल तर कर्णधार हार्दिक पांड्या संघात काही महत्त्वाचे बदल करू शकतो, अशी चर्चा आहे. पाहूया याबद्दल...
मुंबईच्या संघाची सलामी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्मा आणि इशान किशान दोघेही संघाला वेगवान सुरुवात करून देण्यात सातत्याने यशस्वी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे संघ त्यात बदल करणे शक्य नाही. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा हे दोन्ही फलंदाजी चांगल्या लयीत असल्याचे दिसत आहेत. काही वेळा सूर्या फ्लॉफ ठरला आहे, पण तरीही त्याला संधी मिळेल यात वाद नाही. हार्दिक पांड्या आणि नेहाल वढेरा या दोघांचीही फलंदाजी चांगल्या पद्धतीने सुरु आहे. तर सातव्या क्रमांकावर टीम डेव्हिडदेखील फिक्स आहे.
संघात होणार महत्त्वाचा बदल?
गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या काही अंशी बदल करू शकतो असे बोलले जात आहे. गेल्या काही सामन्यात मोहम्मद नबी अपेक्षित यश मिळवून शकलेला नाही. अशा वेळी नबीच्या जागी पुन्हा एकदा झंझावाती फलंदाजी करणाऱ्या रोमारियो शेफर्ड याला अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी दिली जाऊ शकते.
हार्दिक पांड्या गोलंदाजीत आणखी बदल करण्याची फारशी शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीसाठी गेराल्ड कोईत्झे, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा या तिघांना संघात कायम ठेवले जाईल. नुवान तुषाराने अद्याप फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. पण त्याला आणखी काही सामने संधी दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.