IPL 2024 MI vs RCB: RCB ला नमवण्याचे मुंबईसमोर आव्हान; आकडेवारीत मुंबईचा वरचष्मा पण...

IPL 2024 MI vs RCB: आज मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:47 PM2024-04-11T13:47:32+5:302024-04-11T13:57:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 MI vs RCB Mumbai indians and royal challengers bangalore match | IPL 2024 MI vs RCB: RCB ला नमवण्याचे मुंबईसमोर आव्हान; आकडेवारीत मुंबईचा वरचष्मा पण...

IPL 2024 MI vs RCB: RCB ला नमवण्याचे मुंबईसमोर आव्हान; आकडेवारीत मुंबईचा वरचष्मा पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs RCB Match: वानखेडे स्टेडियमवर अर्थात आपल्या घरच्या स्टेडियमवर सलग दुसरा विजय मिळवण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात उतरेल. मुंबईसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान आहे. दोन्हीही संघ आताच्या घडीला संघर्ष करत आहेत. आकडेवारीत जरी मुंबईच्या संघाचा वरचष्मा असला तरी बंगळुरूला पराभूत करणे सोपे नसेल. मागील पाच सामन्यांमध्ये आरसीबीने मुंबईला चारवेळा पराभूत केले आहे. मुंबईला एकच विजय मिळाला असला तरी संपूर्ण आकडेवारी पाहिली तर मुंबईचा दबदबा दिसून येतो. (IPL 2024 News) 

आकडेवारीनुसार, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत ३२ सामने झाले आहेत. यापैकी मुंबईने १८ तर आरसीबीने १४ सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला नमवून मुंबईच्या शिलेदारांनी विजयाचे खाते उघडले.

MI vs RCB थरार

फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीने एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकले नाही. पण, मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल जिंकण्याची किमया साधली. आरसीबीला तीनवेळा फायनलचे तिकीट मिळाले मात्र त्यांना ट्रॉफीपासून दूरच राहावे लागले. मुंबईने आतापर्यंत सहावेळा अंतिम सामना खेळला आहे. आरसीबीने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये अंतिम फेरी गाठली, तर मुंबईने २०१०, २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये फायनलपर्यंत मजल मारण्यात यश मिळवले. 

दरम्यान, खराब फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरू संघाला गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर नमविण्याचे मुंबई संघावर दडपण असेल.  बंगळुरूने पाचपैकी चार, तर मुंबईने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. मुंबईने मागच्या सामन्यात दिल्लीचा २९ धावांनी पराभव केला होता. परंतु, मुंबई-बंगळुरू यांच्यातील मागील पाचपैकी चार सामन्यांत बंगळुरुने बाजी मारली असल्याने मुंबईकरांवर दडपण असेल. दुसरीकडे विराटच्या शानदार कामगिरीनंतरही बंगळुरू संघ पराभव टाळण्यात अपयशी ठरला आहे.

Web Title: IPL 2024 MI vs RCB Mumbai indians and royal challengers bangalore match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.