हार्दिकला Boo काय करताय, तो भारतीय खेळाडू आहे! Virat Kohli ने चाहत्यांना खडसावले, Video 

हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सलग दोन विजय मिळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:28 PM2024-04-11T23:28:57+5:302024-04-11T23:29:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, MI vs RCB : Virat Kohli asking to crowds cheering for Hardik Pandya and reminding he's an Indian player, What a Great gesture by King Kohli, Video | हार्दिकला Boo काय करताय, तो भारतीय खेळाडू आहे! Virat Kohli ने चाहत्यांना खडसावले, Video 

हार्दिकला Boo काय करताय, तो भारतीय खेळाडू आहे! Virat Kohli ने चाहत्यांना खडसावले, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, MI vs RCB : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आज पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सलग दोन विजय मिळवले. RCB ने विजयासाठी ठेवलेले १९७ धावांचे लक्ष्य MI १५.३ षटकांत ७ विकेट्स राखून सहज पार केले. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या ताबडतोड अर्धशतकांना रोहित शर्मा व हार्दिकच्या फटकेबाजीची साथ मिळाली. पण, या सामन्यात विराट कोहलीच्या ( Virat Kohli) एका कृतीने साऱ्यांची मनं जिंकली. 

विराट कोहलीचा पारा चढला...! Umpire ने दिले ४ वादग्रस्त निर्णय, नेटकरी प्रचंड संतापले  

Image

RCB च्या फलंदाजांनीही चांगला जोर लावला होता. रजत पाटीदार, फॅफ ड्यू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांच्या अर्धशतकांनी बंगळुरूला ८ बाद १९६ धावांचा डोंगर उभा करून दिला. ड्यू प्लेसिस ( ६१) व रजत ( ५०) यांनी ८२ धावा जोडून संघाचा डाव सारवला. ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने  २३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा चोपल्या. पण, मुंबईचा जसप्रीत बुमराहने अप्रतिम मारा करून २१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. तिथे बंगळुरूच्या धावा आटल्या.


प्रत्युत्तरात, इशान किशनने ४ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावा चोपल्या. २४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावा केल्या. सूर्यकुमार यादव १९ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावांवर बाद झाला. मुंबईने १५.३ षटकांत ३ बाद १९९ धावा करून मॅच जिंकली. हार्दिकने ६ चेंडूंत नाबाद २१ धावा चोपल्या, तर तिलक वर्मा १६ धावांवर नाबाद राहिला. याही सामन्यात MI च्या चाहत्यांकडून हार्दिकला Boo केले गेले. पण, यावेळी विराट कोहली चाहत्यांवर भडकला. त्याने हार्दिक हा भारतीय खेळाडू आहे, त्याच्याशी असं वागू नका असा सज्जड दम चाहत्यांना भरला. विराटच्या या कृतीने अनेक मनं पुन्हा जिंकली. स्टीव्ह स्मिथलाही चिडवणाऱ्या चाहत्यांना विराटने असाच दम भरला होता. 


 

Web Title: IPL 2024, MI vs RCB : Virat Kohli asking to crowds cheering for Hardik Pandya and reminding he's an Indian player, What a Great gesture by King Kohli, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.