IPL 2024, MI vs RCB : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आज पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सलग दोन विजय मिळवले. RCB ने विजयासाठी ठेवलेले १९७ धावांचे लक्ष्य MI १५.३ षटकांत ७ विकेट्स राखून सहज पार केले. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या ताबडतोड अर्धशतकांना रोहित शर्मा व हार्दिकच्या फटकेबाजीची साथ मिळाली. पण, या सामन्यात विराट कोहलीच्या ( Virat Kohli) एका कृतीने साऱ्यांची मनं जिंकली.
विराट कोहलीचा पारा चढला...! Umpire ने दिले ४ वादग्रस्त निर्णय, नेटकरी प्रचंड संतापले
RCB च्या फलंदाजांनीही चांगला जोर लावला होता. रजत पाटीदार, फॅफ ड्यू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांच्या अर्धशतकांनी बंगळुरूला ८ बाद १९६ धावांचा डोंगर उभा करून दिला. ड्यू प्लेसिस ( ६१) व रजत ( ५०) यांनी ८२ धावा जोडून संघाचा डाव सारवला. ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने २३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा चोपल्या. पण, मुंबईचा जसप्रीत बुमराहने अप्रतिम मारा करून २१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. तिथे बंगळुरूच्या धावा आटल्या.