मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो

इंडियन प्रीमिअर लीग २०२४त आतापर्यंत ५४ साखळी सामने झाले आहेत आणि अजूनही प्ले ऑफची चार संघ निश्चित झालेले नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 07:05 PM2024-05-06T19:05:04+5:302024-05-06T19:05:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Anshul Kamboj has marked his run up so MI will probably hand and IPL debut to the 23-year-old allrounder from Haryana, MI WON THE TOSS & DECIDED TO BOWL FIRST | मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो

मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, MI vs SRH : इंडियन प्रीमिअर लीग २०२४त आतापर्यंत ५४ साखळी सामने झाले आहेत आणि अजूनही प्ले ऑफची चार संघ निश्चित झालेले नाहीत. मुंबई इंडियन्सला ११ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवता आले आहेत आणि ते गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहेत. आज त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे, जे १० सामन्यांत ६ विजय मिळवून चौथ्या क्रमांकावर आहेत. मुंबईने उर्वरित तीन सामने जिंकले तरी त्यांचे १२ गुण होतील आणि ते प्ले ऑफसाठी पुरेसे नाहीत, परंतु ते आता अन्य संघांचं गणित नक्की बिघडवू शकतील. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 


हैदराबादच्या फलंदाजांचा आक्रमकपणा पाहिल्यास मुंबईला ते जमेल असे वाटत नाही. अनुभवी पियूष चावला याला टक्कर देण्यासाठी हैदराबादकडे अभिषेक शर्मा हा युवा फलंदाज आहे. ज्याने ट्वेंटी-२०त लेग स्पिनरविरुद्ध १६ चेंडूंत ४० धावा चोपल्या आहेत आणि दोनदा बाद झाला आहे. ट्रॅव्हिस हेड ज्याने हे पर्व गाजवले आहे, त्याला ट्वेंटी-२०त ३००० धावा पूर्ण करण्यासाठी ८ धावांची गरज आहे. भुवनेश्वर कुमारने तीन विकेट्स घेताच तो ट्वेंटी-२०त ३०० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. उभय संघांत झालेल्या २२ पैकी १२ लढती मुंबईने जिंकल्या आहेत. MI चा गेराल्ड कोएत्झी आज खेळणार नाही, परंतु २३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू अंशुल कंबोज याला (Anshul Kamboj) पदार्पणाची संधी दिली. 

कोण आहे अंशुल कंबोज?
मुंबई इंडियन्सने आज प्लेइंग इलेव्हनमध्ये अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी दिली. हरयाणातील कर्नाल येथील क्रिकेटपटू अंशुल कंबोजला  मागच्या वर्षी लिलावात २० लाखांत विकत घेण्यात आले आहे. अंशुल कंबोज हा अष्टपैलू खेळाडू आहे, तो एक फलंदाज तसेच वेगवान गोलंदाज आहे. मागच्या वर्षी त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत १७ बळी घेतले आणि त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे हरियाणाने प्रथमच विजय हजारे ट्रॉफी जिंकली. त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघासाठीही कामगिरी केली आहे. अं 

Web Title: IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Anshul Kamboj has marked his run up so MI will probably hand and IPL debut to the 23-year-old allrounder from Haryana, MI WON THE TOSS & DECIDED TO BOWL FIRST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.