आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये फायर ब्रँड असलेल्या सनरायझर्स हैदराबादची तोफ थंड ठेवण्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना यश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:19 PM2024-05-06T21:19:15+5:302024-05-06T21:24:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Piyush Chawla & Hardik Pandya picked 3 wickets each, MI bowlers dominance against SRH, MI needs 174 runs to win | आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला

आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, MI vs SRH  Live Marathi  : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये फायर ब्रँड असलेल्या सनरायझर्स हैदराबादची तोफ थंड ठेवण्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना यश आले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये जसप्रीत बुमराहने दोन भन्नाट षटकं टाकून SRH ला धक्का दिला. त्यात पदार्पणवीर अंशुल कंबोजनेही चांगला मारा केला. पियूष चावला ( ३-३३ ) याने MI ला ट्रॅव्हिस हेड व हेनरिच क्लासेन या दोन मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. SRH ची तगडी बॅटींग लाईन १३व्या षटकापर्यंत तंबूत परतली होती. हार्दिक पांड्यानेही ३ विकेट्स घेतल्या आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पूर्वी हार्दिकचे फॉर्मात परतणे हे टीम इंडियासाठी चांगले संकेत आहेत. 

बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  


मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या सलामीवीरांना हात मोकळे करू दिले नाही. नुवान तुषारा आणि पदार्पणवीर अंशुल कंबोज यांनी चांगला मारा केला. कंबोजने SRHच्या ट्रॅव्हिस हेडचे त्रिफळे उडवले होते, परंतु तो चेंडू नो बॉल ठरला. पण, जसप्रीत बुमराहने अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला.    पदार्पणवीर अंशुल कंबोजने अप्रतिम चेंडूवर हेडचा त्रिफळा उडवला, परंतु नो बॉलने SRH च्या फलंदाजाला जीवदान मिळाले. त्यात ८व्या षटकात कंबोजच्या गोलंदाजीवर हेडचा सोपा झेल तुषाराने टाकला . पण, त्याची भरपाई त्याने मयांग अग्रवालचा ( ५) त्रिफळा उडवून केली. कंबोजने त्याच्या स्पेलमध्ये ४  षटकांत ४२ धावा देत १ विकेट घेतली. हैदराबादने १० षटकांत २ बाद ८८ धावा केल्या. 


११व्या षटकात पियूष चावला याला गोलंदाजीला आणणे फायद्याचे ठरले आणि हेड मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर बाद झाला. त्याने ३० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४८ धावा केल्या.  हार्दिक पांड्याने पुढच्या षटकात नितिश कुमार रेड्डीला ( २०) माघारी जाण्यास भाग पाडले. हार्दिकच्या बाऊन्सरवर रेड्डीचा पुल शॉट चूकला. चावलाने अप्रतिम गुगलीवर हेनरिच क्लासेनाचा ( २) त्रिफळा उडवून SRH ची अवस्था ५ बाद ९६ अशी केली.  हार्दिकने १६व्या षटकात शाहबाज अहमदला ( १०) बाद करून हैदराबादला सहावा धक्का दिला. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आज आनंदाचे वातावरण दिसले. त्याच षटकात मार्को यान्सेनचा ( १७) त्रिफळा उडवून हार्दिकने जोरदार सेलिब्रेशन केले. हार्दिकने ४-०-३१-३ अशी स्पेल टाकली आणि मागील दोन सामन्यांतही त्याने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. 

पॅट कमिन्स ( १७ चेंडूंत ३५ धावा ) व सनवीर सिंग ( ८)  यांनी हैदराबादला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारून दिली. 

Web Title: IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Piyush Chawla & Hardik Pandya picked 3 wickets each, MI bowlers dominance against SRH, MI needs 174 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.