हार्दिकनंतर आणखी एकाला लागलेत मुंबई इंडियन्समधील परतीचे वेध, जसप्रीतची नाराजी अधिक वाढणार?

आयपीएल रिटेन्शनच्या शेवटच्या दिवशी मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यात डिल झाले आणि हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 04:25 PM2023-11-28T16:25:57+5:302023-11-28T16:26:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Mitchell McClenaghan came forward to talk of a potential return to five-time IPL champions Mumbai Indians.  | हार्दिकनंतर आणखी एकाला लागलेत मुंबई इंडियन्समधील परतीचे वेध, जसप्रीतची नाराजी अधिक वाढणार?

हार्दिकनंतर आणखी एकाला लागलेत मुंबई इंडियन्समधील परतीचे वेध, जसप्रीतची नाराजी अधिक वाढणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : बऱ्याच नाट्यमोय घडामोडीनंतर हार्दिक पांड्या अखेर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुन्हा परतला.. गुजरात टायटन्सला पहिल्याच पर्वात हार्दिकने नेतृत्व कौशल्याच्या जोरावर जेतेपद पटकावून दिले आणि त्यानंतर २०२३मध्ये हा संघ उपविजेता राहिला. पण, हार्दिक व गुजरात फ्रँचायझीमध्ये काहीतरी बिनसले अन् त्याने मुंबई इंडियन्सकडे पुन्हा जाण्याचे ठरवले. आयपीएल रिटेन्शनच्या शेवटच्या दिवशी मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यात डिल झाले आणि हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला. पण, हार्दिकच्या येण्याने प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यात हार्दिकनंतर आणखी एक माजी खेळाडू मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे जसप्रीतची नाराजी कदाचित आणखी वाढू शकते.

'रोहितने मीडियासमोर असे बोलायला नको होते': राहुल द्रविडवरील वक्तव्यावर गौतम गंभीर नाराज


हार्दिकला २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सने १० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. पण, आयपीएल २०२२ पूर्वी संघाने त्याला करारमुक्त केले. मुंबईने हार्दिकला पुन्हा १५ कोटींमध्ये करारबद्ध केले आहे. या सगळ्यात मुंबई इंडियन्सचा आणखी एक माजी खेळाडू म्हणजेच मिचेल मॅक्लेनघनला ( Mitchell McClenaghan ) संघात पुनरागमन करायचे आहे. मिचेल यालाही संघात पुनरागमन करायचे आहे. पण त्याला खेळाडू म्हणून नाही तर कोचिंग स्टाफ म्हणून संघात सामील व्हायचे आहे. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल २०१५ ते २०२० या काळात मुंबई इंडियन्सशी संबंधित होता आणि त्याने संघासह ४ आयपीएल विजेतेपदही जिंकले आहेत. 


३७वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाजाने ५६ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ७१ विकेट घेतल्या आहेत.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली होती. निवृत्तीनंतर हा माजी खेळाडू आता कोचिंग कोर्स करत आहे जिथे त्याला भविष्यात मुंबई इंडियन्समध्ये सामील व्हायचे आहे. त्याने हिंदुस्तान टाईम्सशी केलेल्या विशेष संवादात सांगितले की, मला ट्विटरवर अनेक लोकांकडून संदेश येतात ज्यामध्ये प्रत्येकजण विचारतो की मी कधी परतणार आहे. पण सध्या मी माझा कोचिंग कोर्स पूर्ण करत आहे आणि खेळाबद्दल अधिक शिकत आहे. हा एक खेळ आहे आणि त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. मला त्यात खोलवर जायचे आहे. स्थानिक असो की जागतिक स्तरावर, मला टी-२० सर्किटमध्ये सहभागी व्हायचे आहे. मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होण्याचे माझे ध्येय आहे.

हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेणं मुंबई इंडियन्सला फायद्याचं ठरेल का?

हो (1712 votes)
नाही (1403 votes)

Total Votes: 3115

VOTEBack to voteView Results

Web Title: IPL 2024 : Mitchell McClenaghan came forward to talk of a potential return to five-time IPL champions Mumbai Indians. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.