IPL 2024 Mock Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी उद्या दुबईत मिनी ऑक्शन होणार आहे. १० फ्रँचायझीमधील एकूण ७७ रिक्त जागांसाठी ३३३ खेळाडू शर्यतीत आहेत. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर या स्टार्सनी माघार घेतली असली तरी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्ससारखे खेळाडू मैदानात आहेत. ८ वर्षांनी आयपीएलमध्ये परतणाऱ्या स्टार्कसाठी चढाओढ रंगेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्याच्या मिनी ऑक्शनपूर्वी आज जिओ सिनेमाने मॉक ऑक्शन ( JioCinema Mock Auction) घेण्यात आले आणि त्यात मिचेल स्टार्कवर १८.५ कोटींची बोली लावली गेली. पॅट कमिन्ससाठी १७.५ कोटी आणि त्यानंतर सर्वाधिक १४ कोटींचा भाव शार्दूल ठाकूरवर लागला.
निता अंबानी, काव्या मारन ते प्रीती झिंटा; IPL 2024 Auctionमध्ये फ्रँचायझींकडून कोण कोण येणार?
या मॉक ऑक्शनमध्ये RCB कडून माईक हेसन यांनी प्रतिनिधित्व केले आणि त्यांनी १८.५ कोटी ही रक्कम स्टार्कवर लावली. गुजरात टायनट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पार्थिव पटेलने दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज गेराल्ड कोएत्झीवर १८ कोटींची बोली लावली. पंजाब किंग्सने अष्टपैलू शार्दूल ठाकूरसाठी बक्कळ रक्कम मोजली. चेन्नई सुपर किंग्ससाठी सुरेश रैनाने रणनीती आखली आणि त्याने ट्रॅव्हिस हेड ( ७.५ कोटी) व वनिंदू हसरंगा ( ८.५ कोटी) यांच्यासाठी आग्रह धरला.
सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इयॉन मॉर्गनने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यासाठई १७.५ कोटींची बोली लावली.
लिलावात ३३३ खेळाडू...
IPL 2024 च्या मिनी लिलावासाठी ३३३ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ज्यामध्ये संघांकडे फक्त ७७ स्लॉट शिल्लक आहेत. म्हणजेच भारतीय आणि परदेशी खेळाडूंसह एकूण ७७ खेळाडू सर्व १० फ्रँचायझीमध्ये सामील होऊ शकतील. लिलावानंतर ट्रेड विंडोद्वारे खेळाडूंच्या नशिबाचा कलही बदलू शकतो. वृत्तानुसार, ही ट्रेड विंडो २० डिसेंबरपासून उघडेल आणि फेब्रुवारी २०२४ पर्यंत खुली राहील.
ट्रेड विंडोचे नियम काय आहेत?
आयपीएल २०२४च्या लिलावापूर्वी बंद करण्यात आलेली ट्रेडिंग विंडो २० डिसेंबरनंतर पुन्हा खुली होणार आहे. त्यामुळे लिलावानंतर ते आयपीएल २०२४ ला सुरू होण्यास १ महिना शिल्लक असेपर्यंत आणखी मोठी घडामोड झालेली पाहायला मिळू शकते. ट्रेडद्वारे, एक खेळाडू केवळ ट्रेड विंडो उघडी असतानाच एका फ्रँचायझीमधून दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये जाऊ शकतो. हा सर्व-कॅश डील किंवा प्लेअर फॉर प्लेयर डील असू शकतो. नियमानुसार, आयपीएल स्पर्धा ट्रेड विंडो संपल्यानंतर एक महिन्यानंतर सुरू होते.
Web Title: IPL 2024 Mock Auction at JioCinema: RCB get Starc for Rs 18.5 cr; Coetzee, Shardul secure big bucks
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.