MS Dhoni batting for CSK IPL 2024: भारतीय संघाचा नव्या दमाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद भुषवत आहे. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली CSK आधी RCBला आणि नंतर पंजाबच्या संघाला पराभूत करत दुहेरी विजयी सलामी दिली. दोन्ही सामन्यात CSKच्या फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आणि सामन्यात रंगत आणली. पण प्रेक्षकांना अद्याप धोनीची धडाकेबाज फलंदाजी पाहता आलेली नाही. IPLमधील एक नियम सध्या धोनीच्या फलंदाजीच्या आड येत असल्याचे संघाचे बॅटिंग कोच माइक हसीने सांगितले.
चेन्नईच्या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आणि दोन्ही सामने जिंकले. पण आतापर्यंत फलंदाजीमध्ये धोनीचा नंबर आला नाही. पहिल्या सामन्यात CSKने ४ तर दुसऱ्या सामन्यात ६ बळी गमावले होते. पण तरीदेखील धोनीला फलंदाजीला उतरता आले नाही. त्यामागे नक्की काय कारण आहे? यावर बॅटिंग कोच माइक हसी म्हणाला की, हेड कोच स्टिफन फ्लेमिंगशी चर्चा करून आम्हीच धोनीला बॅटिंग ऑर्डरमध्ये आठव्या क्रमांकावर ठेवले आहे. धोनीने सामना त्याच्या स्टाईलमध्ये 'फिनिश' करावा या उद्देशाने हा प्लॅन आखण्यात आला आहे. IPL मध्ये Impact Player हा नियम असल्यामुळे फलंदाजीमध्ये एक खेळाडू वाढतो जो धोनीच्या आधी खेळतो. या कारणाने धोनी आठव्या नंबरवर आहे आणि त्याला अजूनही मैदानात उतरता आलेले नाही. पण नेट्समध्ये धोनीचा बॅटिंगचा सराव अप्रतिम सुरू आहे.
कर्णधार बदलल्याने खेळाडू पडले गोंधळात
स्पर्धा सुरु होण्याआधीच चेन्नईने आपला कर्णधार बदलला. धोनीच्या जागी ऋतुराजला कॅप्टन केले. पण इतक्या वर्षांपासून धोनी कर्णधार असण्याची सवय असलेल्या काही खेळाडूंचा यामुळे मैदानात गोंधळ उडतो, असे त्यांचाच खेळाडू दीपक चहरने सांगितले. तो म्हणाला की, हल्ली मैदानात काही घडलं की आम्ही दोन जणांकडून परवानगी घेतो असे वाटते. अपील केल्यावर किंवा इतर कोणत्याही निर्णयासाठी मी ऋतुराज आणि धोनी दोघांकडेही बघतो. कारण मी खूप गोंधळात पडतो. ऋतुराज उत्तमच आहे, पण परवानगीसाठी धोनीकडेही पाहावं लागते. ही गोष्ट चहरने जरी मस्करीच्या स्वरात म्हटली असली खेळाडूंचा गोंधळ दोन्ही सामन्यात स्पष्ट दिसला आहे.