IPL 2024 Mumbai Indians Hardik Pandya Rohit Sharma Akash Ambani Photo Viral: IPL ही स्पर्धा सुरू होणार असेल तर भारतीय फॅन्समध्येच राडा पाहायला मिळतो. याचं कारण भारतीय संघातील खेळाडू IPLमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळत असतात. त्यामुळे प्रत्येक संघाचे चाहतावर्ग वेगळा असतो. पण यंदाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघात वेगळेच चित्र असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मुंबईच्या संघाने सर्वाधिक ५ विजेतेपदे मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा याला पदावरून काढले. गुजरात संघाकडून आयात करून हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार केले. त्यामुळे मुंबईच्या संघातील खेळाडूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये नाराजी स्पष्ट दिसून येते. तशातच पहिल्या दोन सामन्यांमध्ये हार्दिक आणि रोहित यांच्यात काहीसा बेबनाव असल्याचे दिसल्याचे निरीक्षण चाहत्यांनी नोंदवले होते. तशातच पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर आता एक फोटो व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोवरून मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन काही मोठा आणि कठोर निर्णय घेणार का, अशी चर्चा रंगली आहे. (Change in Captaincy)
हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून मुंबईच्या संघात यंदा दाखल झाला. त्याआधी तो गुजरात संघाचा कर्णधार होता. गेल्या दोनही IPLमध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ फायनलमध्ये गेला होता. त्यामुळेच हार्दिकला मुंबईचे कर्णधारपद देण्यात आले. पण यंदा हार्दिकने कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यापासून मुंबईला आधी गुजरात विरूद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. पण बुधवारच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने मुंबईला प्रचंड चोप दिला. समालोचक आणि मुंबईचे चाहते यांनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील चुका बरोबर हेरल्या. त्याची रोहितशी वर्तणूकदेखील खिलाडीवृत्तीला धरून नसल्याचे अनेकांनी म्हटले होते. तशातच सामन्यात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर मैदानातील एक फोटो व्हायरल झाला असून त्यात रोहित शर्मा आणि संघ सहमालक आकाश अंबानी काहीसे रागात दिसत आहेत आणि हार्दिक पांड्या हातवारे करून काहीतरी सांगायचा प्रयत्न करताना दिसतो आहे. या फोटोवरून चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लढविले आहेत. मुंबईचा संघ लवकरच हार्दिकला कर्णधारपदावरून दूर करून रोहितला पुन्हा नेतृत्व करायला देण्याचा मोठा निर्णय घेतील, असे अनेकांचे मत आहे. पाहा चाहत्यांचे ट्विट-
------------
---------------
-------------
-------------
दरम्यान, कालच्या सामन्यात हैदराबादने फलंदाजी करताना 277 धावांचा डोंगर रचला हेनरिक क्लासेन याने 34 चेंडू नाबाद 80 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनीही तुफानी फटकेबाजी केली. अभिषेक शर्माने केवळ १६ धावांत आपले अर्धशतक पूर्ण केले. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईला 278 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईनेदेखील तडाखेबाज सुरुवात केली. मुंबईकडून तिलक वर्माने 64 धावांची खेळी केली. ईशान किशनने 13 चेंडूत 34 धावा मारल्या तर टीम डेविडने शेवटपर्यंत झुंज देत 22 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. परंतु मुंबईचा पराभव झाला.