हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; Home गेमपूर्वी फॅन्ससाठी नियमावली जाहीर 

रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) बसवणे फॅन्सच्या पचनी पडलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 06:00 PM2024-04-01T18:00:31+5:302024-04-01T18:01:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Mumbai Indians has released ‘tips’ for fans to follow : Wankhede bans offensive language & gestures as MI brace for Hardik Pandya ‘welcome’ | हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; Home गेमपूर्वी फॅन्ससाठी नियमावली जाहीर 

हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; Home गेमपूर्वी फॅन्ससाठी नियमावली जाहीर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi :  रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) बसवणे फॅन्सच्या पचनी पडलेलं नाही. हार्दिक पांड्याला अहमदाबादमधील त्याच्या घरच्या प्रेक्षकांच्याही रोषाचा सामना करावा लागला. हैदराबादमध्येही हार्दिकला हाच अनुभव आला आणि आज MI त्यांचा घरच्या मैदानावरील पहिला सामना खेळणार आहे. पण, वानखेडे स्टेडियमच्या बाहेर रोहितच्या नावाचाच गजर पाहायला मिळतोय... रोहितच्या नावाचे टी शर्ट घालून हजारो चाहते मैदानाच्या दिशेने जात आहेत. अशा वेळी हार्दिकला घरच्या मैदानावरही चाहत्यांचा रोष पत्करावा लागेल, असे चिन्हे आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Mumbai Indians ने नियमावली जाहीर केली आहे. 


वानखेडे स्टेडियमवर MI च्या पहिल्या घरच्या सामन्यातून हार्दिकचे त्याच्या 'जुन्या' घरी स्वागत होणार आहे. फ्रँचायझी त्यासाठी सज्ज होत आहे. आज MI vs RR सामन्यापूर्वी फ्रँचायझीने चाहत्यांना वानखेडेवर कोणत्याच त्रासाचा सामना करायचा नसेल तर नियमांचे पालक करण्याचे आवाहन केले आहे. फ्रँचायझीने चाहत्यांसाठी काही 'टिप्स' जारी केल्या आहेत. नियमांमध्ये भुवया उंचावणाऱ्या काही सूचनांचा समावेश  आहे. हार्दिक पांड्याला त्रास होणार नाही याची खात्री करण्यासाठी फ्रँचायझीने तीन नियम आणले आहेत.

  • आक्षेपार्ह चिन्ह
  • आक्षेपार्ह/धमकीदायक आचरण
  • भेदभाव करणारी भाषा किंवा हावभाव

 

हे नियम भारतातील प्रत्येक स्टेडियमवर लागू केले जातात, परंतु फ्रँचायझीने यात हे  नवीन नियम आणले आहेत.  

आयपीएल २०२४ ची १३ सामने झाले आहेत आणि यात मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे ज्यांना विजय मिळवता आलेला नाही.  चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी प्रत्येकी ३ सामने खेळले आहेत. चेन्नईने RCB व GT यांच्यावर विजय मिळवला आहे, तर DC कडून त्यांना हार पत्करावी लागली आहे. KKR ने दोन्ही सामन्यांत RCB व SRH यांना, RR ने त्यांच्या दोन सामन्यांत DC व LSG ला पराभूत केले आहे. हे दोनच संघ आतापर्यंत अपराजित आहेत. सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खात्यात प्रत्येकी २ गुण आहेत.

Web Title: IPL 2024 : Mumbai Indians has released ‘tips’ for fans to follow : Wankhede bans offensive language & gestures as MI brace for Hardik Pandya ‘welcome’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.