IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ ला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) आणखी एक धक्का बसला आहे. जलदगती गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे आणि त्याच्या जागी ल्यूक वूडचा समावेश केला गेला आहे. वुड हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने इंग्लंडकडून पाच सामने खेळले आहेत. ज्यात त्याने एकूण ८ विकेट घेतल्या आहेत. वूड ५० लाखांच्या किमतीत MI मध्ये सामील होणार आहे.
इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वूडने पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तो बाबर आझमच्या संघाकडून खेळताना उत्कृष्ट कौशल्य दाखवले. उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध वूड चांगला स्विंग करतो. ११ मार्च रोजी या खेळाडूने पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्जसाठी चमकदार कामगिरी केली होती.
मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, ल्युक वूड