Join us  

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सौराष्ट्रच्या खेळाडूची एन्ट्री, भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य

२४वर्षीय हार्विकने खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक केले आहे आणि २०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 4:29 PM

Open in App

IPL 2024 : यष्टिरक्षक फलंदाज विष्णू विनोद याने हाताला झालेल्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. मुंबई इंडियन्सने सौराष्ट्रचा यष्टिरक्षक फलंदाज हार्विक देसाईला ( Harvik Desai ) बदली खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे. २४वर्षीय हार्विकने खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक केले आहे आणि २०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता.

हार्विक देसाईने २६ फेब्रुवारी २०१७ रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रासाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले.  डिसेंबर २०१७ मध्ये  १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०१८ स्पर्धेसाठी भारताच्या संघात त्याची निवड झाली होती.  त्याने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासाठी विजयी धावा केल्या होत्या. त्याने १ नोव्हेंबर २०१८ रोजी रणजी करंडक स्पर्धेत सौराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  

 हार्विकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४६ सामन्यांत ५ शतकं व १६ अर्धशतकांसह २६५८ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्येही ४० सामन्यांत त्याच्या नावावर १३४१ धावा आहेत आणि ४ शतकं व ९ अर्धशतकांचा समावेश आहे. २७ ट्वेंटी-२०त १ शतक व ४ अर्धशतकांसह त्याने ६९१ धावा केल्या आहेत. इशान किशनचा फॉर्म पाहता हार्विक हा मुंबई इंडियन्ससाठी यष्टिरक्षक फलंजदाज म्हणून उत्तम पर्याय मिळाला आहे. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्स